Teenager Sam Konstas earns call up to Australia squad for Boxing Day Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (BGT) स्पर्धेतील उर्वरित दोन समाने मेलबर्न आणि सिडनीच्या मैदानातखेळवण्यात येणार आहेत. या सामन्याआधी ऑस्ट्रेलियन संघात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. पहिल्या तीन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात करणारा युवा सलामीवीर नॅथन मॅकस्विनी याला संघातून डच्चू देण्यात आला आहे. दुसरीकडे १९ वर्षाच्या पोराची ऑस्ट्रेलियन संघात वर्णी लागली आहे. दुखापतीमुळे हेजलवूडनं स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे त्याच्या जागी झाए रिचर्डसन याला संधी देण्यात आली आहे. जवळपास तीन वर्षानंतर त्याला कसोटी संघात स्थान मिळाले आहे.
मैदानात उतरताच या १९ वर्षीय पोराच्या नावे होईल खास रेकॉर्ड
ऑस्ट्रेलियन संघानं टीम इंडियाविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांसाठी सॅम कोन्स्टास (Sam Konstas) याला १५ सदस्यीय संघात स्थान दिले आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळताच एक खास विक्रम या १९ वर्षीय पोराच्या नावे नोंदवला जाईल. कारण मागील ७० वर्षांत ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत पदार्पण करणारा तो सर्वात युवा क्रिकेटर ठरेल. मॅकस्विनीच्या जागी त्याची संघात एन्ट्री झाल्यामुळे तो प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल एवढेच नाही तर तो ऑस्ट्रेलियन संघाच्या डावाटी सुरुवातही करताना दिसू शकतो.
टीम इंडियाविरुद्ध शतकी खेळीमुळे मिळाली मोठी संधी
सॅम कोन्स्टास (Sam Konstas) हा पिंक बॉल टेस्ट आधी कॅनबेराच्या मैदानात रंगलेल्या टीम इंडियाविरुद्ध सराव सामन्यात प्राइम मिनिस्टर इलेव्हन संघाचा भाग होता. या सामन्यात त्याने १०७ धावांची दमदार खेळी केली होती. याच खेळीमुळे त्याला ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने आपल्यातील बॅटिंगची धमक दाखवली आहे. ६ डिसेंबरला फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने ८८ धावांची खेळी केली होती.
कोण आहे सॅम कोन्स्टास? (Sam Konstas)
सॅम कोन्स्टास उजव्या हाताने फलंदाजी करणारा सलामीचा बॅटर आहे. न्यू साउथ वेल्स आणि ऑस्ट्रेलिया अंडर-१९ क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सॅमनं ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत 'अ' संघाविरुद्धच्या अनाधिकृत कसोटी सामन्यातही आपल्या बॅटिंगमधील धमक दाखवली होती. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारत 'अ' संघाविरुद्धच्या दुसऱ्या अनौपचारिक कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात त्याने नाबाद ७३ धावांची खेळी केली होती. सॅमनं आतापर्यंत ११ फर्स्ट क्लास सामन्यात ४२.२३ च्या सरासरीनं७१८ धावा केल्या आहेत.
Web Title: AUS vs IND BGT 2024 25 Teenager Sam Konstas earns call up to Australia squad for Boxing Day Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.