भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या पाच सामन्यातील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील गाबा स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. ज्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं सुरुवातीपासून वचप ठेवली त्या सामन्यात चौथ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप जोडीनं बॅटिंगमध्ये खास कामगिरीची नोंद करत टीम इंडियाला मोठा दिलासा दिला. फॉलोऑनची नामुष्की टाळून दाखवण्याच चॅलेंज त्यांनी परतवून दाखवलं. .
आकाशदीप-बुमराहची दमदार भागीदारी
चौथ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप या जोडीनं ५३ चेंडूत नाबाद ३९ धावांची भागीदारीसह टीम इंडियाला फॉलोऑनच्या विळख्यातून बाहेर काढलं. जसप्रीत बुमराहनं २७ चेंडूत १० धावांची नाबाद खेळी केली. दुसरीकडे आकाशदीपनं ३१ चेंडूत नाबाद २७ धावा केल्या. या इनिंगमध्ये आकाशदीपच्या भात्यातून २ खणखणीत चौकारांसह एक गगनचुंबी षटकार पाहायला मिळाला.
आकाशदीपनं पॅट कमिन्सच्या चेंडूला दाखवलं आस्मान, विराटसह रोहितनं अशी दिली दाद
फॉलोऑन टाळण्यासाठी अगदी संयमी खेळी करणाऱ्या आकाशदीपनं चौथ्या दिवसाच्या अखेरीस जाता जाता आपल्या भात्यातील मोठ्या फटकेबाजीचा नजराणाही पेश केला. भारतीय संघाच्या पहिल्या डावातील ७४ व्या षटकातील त्याने पॅट कमिन्सनं टाकलेल्या दुसऱ्या चेंडूला थेट आस्मान दाखवलं. त्याचा हा फटका बघून विराट कोहली आवाक् झाला. आकाशदीपच्या भात्यातून निघालेला षटकार पाहताना किंग कोहलीनं ड्रेसिंग रुममधून दाखवून दिलेला अंदाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. एवढेच नाही तर रोहित शर्मानंही आकाशदीपच्या स्ट्रोकला टाळ्या वाजवत दाद दिल्याचे पाहायला मिळाले. अंदाज
हातात विराटची बॅट, जी बॅट कधीकाळी अनलकही ठरली त्या बॅटनं टीम इंडियाची नामुष्की टाळली
क्रिकेटच्या मैदानात अनेकदा गोलंदाजांना स्टार फलंदाजाच्या बॅटनं खेळण्याचा मोह होतो. आकाशदीप त्याला अपवाद नाही. तो कोहलीच्या बॅटनं खेळण्याला पसंती देताना दिसून येते. विराट कोहलीनं आपली एक बॅट त्याला कानपूर टेस्ट दरम्यान दिली होती. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत वानखेडेच्या मैदानात हीच बॅट आकाशदीपसाठी अनलकीही ठरली होती. कोहलीच्या बॅटन खेळताना तो एकही चेंडूचा सामना न करता रनआउट झाला होता. पण यावेळी त्याच बॅटनं त्याने टीम इंडियावर ओढावणारी फॉलोऑनची नामुष्की टाळणारी कडक फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले.