...अन् स्मिथनं आपल्याच पायावर मारुन घेतली 'कुऱ्हाड'; विकेट वाचवण्यापेक्षा चेंडू बघत बसला (VIDEO)

शतकी खेळीनं अनेक विक्रम मोडीत काढणाऱ्या स्मिथ ज्या पद्धतीने बाद झाला त्याची चर्चा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 08:56 IST2024-12-27T08:53:04+5:302024-12-27T08:56:37+5:30

whatsapp join usJoin us
AUS vs IND 4th Test Steve Smith Heartbroken After Never Seen Before Bowled Dismissal In MCG Test Akash Deep Take His Wicket | ...अन् स्मिथनं आपल्याच पायावर मारुन घेतली 'कुऱ्हाड'; विकेट वाचवण्यापेक्षा चेंडू बघत बसला (VIDEO)

...अन् स्मिथनं आपल्याच पायावर मारुन घेतली 'कुऱ्हाड'; विकेट वाचवण्यापेक्षा चेंडू बघत बसला (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 4th Test Day 2 Steve Smith Suffers Unlucky Dismissal  : मेलबर्नच्या मैदानातील बॉक्सिंग टेस्टमध्ये स्टीव्ह  स्मिथनं सलग दुसरे शतक झळकावले. चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळात तो अगदी लयीत खेळत होता. पण त्याने स्मिथ विचित्र पद्धतीने आपली विकेट फिकेली. शतकी खेळीनं अनेक विक्रम मोडीत काढणाऱ्या स्मिथ ज्या पद्धतीने बाद झाला त्याची चर्चा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

आकाशदीपच्या बॅक-ऑफ-द-लेन्थ डिलीव्हरीवर फसला स्मिथ

लंचनंतर ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ११५ व्या षटकात  स्मिथ आणि नॅथन लायनही जोडी मैदानात होती.  लंच ब्रेकनंतर रवींद्र जडेजाने मिचेल स्टार्कची विकेट घेत ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का दिला. त्यानंतर आकाशदीपच्या खात्यात स्मिथची विकेट जमा झाली. आकाश दीपनं जवळपास १२८.५ kph वेगाने टाकलेले बॅक-ऑफ-द-लेन्थ डिलीव्हरीवर तो फसला. 

चेंडू हळू हळू स्टंपकडे जात असताना तो फक्त बघत बसला!

आकाशदीपच्या गोलंदाजीवर स्मिथनं पुढे येऊन फटका मारण्याा प्रयत्न केला. पण त्याने खेळला फटका परफेक्ट बसला नाही. परिणामी बॅटची कड घेऊन चेंडू त्याच्या पॅडवर आपटला आणि हा चेंडू स्टंपवर जाऊन आदळला. चेंडू स्टंपच्या दिशेन जात असताना स्मिथला तो रोखण्याची संधी होती. पण त्याने विकेट वाचवण्याचा साधा प्रयत्नही केला नाही.

Web Title: AUS vs IND 4th Test Steve Smith Heartbroken After Never Seen Before Bowled Dismissal In MCG Test Akash Deep Take His Wicket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.