जैस्वाल एकटा पडला अन् ऑस्ट्रेलियाचा डाव 'यशस्वी' ठरला! टीम इंडिया टेस्टमध्ये 'नापास'

ऑस्ट्रेलिया संघानं ५ सामन्यांच्या मालिकेत घेतली २-१ अशी आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 12:16 IST2024-12-30T12:04:38+5:302024-12-30T12:16:57+5:30

whatsapp join usJoin us
AUS vs IND 4th Test Day 5 Australia Won By 184 Runs Against Team India At Melbourne Boxing Day Test And Lead 2-1 BGT Series | जैस्वाल एकटा पडला अन् ऑस्ट्रेलियाचा डाव 'यशस्वी' ठरला! टीम इंडिया टेस्टमध्ये 'नापास'

जैस्वाल एकटा पडला अन् ऑस्ट्रेलियाचा डाव 'यशस्वी' ठरला! टीम इंडिया टेस्टमध्ये 'नापास'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 Australia Won By 184 Runs Against Team India At Melbourne Boxing Day Test :  मेलबर्नच्या मैदानातील बॉक्सिंग डे सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सेशनआधीच्या टी ब्रेकनंतर ट्रॅविस हेडनं पंतची विकेट्स घेत ऑस्ट्रेलियासाठी विजयाचे दरवाजे उघडले. उरली सुरली कसर बोलँड आणि लायन यांनी पूर्ण केली. तिसऱ्या सेशनमध्ये भारतीय संघानं एका तासाआधीच सात विकेट्स गमावल्यामुळे संघाला १८४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने टीम इंडियासमोर विजयासाठी ३४० धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा दुसरा डाव १५५ धावांवर आटोपला. 

टीम इंडियाकडून यशस्वी एकटा नडला; त्याच्याशिवाय पंत वगळता एकानंही गाठला नाही दुहेरी आकडा

यशस्वी जैस्वालनं केलेल्या २०८ चेंडूतील ८४ धावांची खेळी आणि रिषभ पंतनं १०४ चेंडूत केलेल्या ३० धावा वगळता अन्य एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील घरच्या मैदानातील मागील दोन मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मेलबर्नच्या मैदानातील बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह ऑस्ट्रेलियन पुन्हा ही नामुष्की ओढावणार नाही, हे निश्चित केले आहे. एवढेच नाही तर  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकले आहे. 

ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅविस हेडनं उघडले विजयाचे दरवाजे

ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात कर्णधार पॅट कमिन्स आणि लोकल बॉय स्कॉट बोलँड यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. फिरकीपटू नॅथन लायन याने दोन बळी टिपले. याशिवाय मिचेल मार्श आणि ट्रॅविस हेड यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. या सामन्यात ट्रॅविस हेडला बॅटिंगमध्ये फार काही करता आले नाही. पण त्याने गोलंदाजीत एक विकेट घेऊन सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं वळवला. रिषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल ही सेट झालेली जोडी फोडून त्याने ऑस्ट्रेलियासाठी विजयाचे दरवाजे उघडले.

Web Title: AUS vs IND 4th Test Day 5 Australia Won By 184 Runs Against Team India At Melbourne Boxing Day Test And Lead 2-1 BGT Series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.