Australia vs India, 3rd Test Day 3 : ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर रंगलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात ही ढगाळ वातावरण आणि पाऊस अशीच सुरुवात झाली. अॅलेक्स कॅरी आणि मिचेल स्टार्क या जोडीनं ७ बाद ४०५ धावांवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या जोडीनं भारताकडून गोलंदाजीला सुरुवात केली.
तिसऱ्या दिवसाच्या खेळात जसप्रीत बुमराहनं मिळवून दिली पहिली विकेट
जसप्रीत बुमराहनं स्टार्कच्या १८ (३०) रुपात आणखी एक विकेट आपल्या खात्यात जमा करत ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का दिला. बुमराहची ब्रिस्बेनच्या मैदानातील ही सहावी विकेट ठरली. या विकेट आधीच कॅरीनं अर्धशतक पूर्ण केले. तिसऱ्या दिवसाच्या खेळात कॅरी-स्टार्क जोडी संघाच्या धावसंख्येत १८ धावांची भर घातली. पावसामुळे १० मिनिटांच्या छोट्या ब्रेकनंतर खेळाला पुन्हा सुरुवात झाली. या ब्रेकनंतर रोहित शर्मानं मोहम्मद सिराजच्या हाती चेंडू सोपवला.
सिराजसह आकाश दीपनं उघडलं विकेट्सच खात, तिसऱ्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियानं काढल्या ४० धावा
त्याने लायनच्या २(३०) रुपात ऑस्ट्रेलियाला नववा धक्का दिला. ही त्याची पहिली विकेट ठरली. सेट झालेल्या अॅलेक्स कॅरीच्या रुपात आकाश दीपनं या सामन्यातील आपली पहिली विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपुष्टात आणला. अॅलेक्स कॅरीनं ८८ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ७० धावा केल्या. तिसऱ्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियाच्या संघाने ३ विकेट्सच्या मोबदल्यात ४० धावांची भर घालत धावफलकावर ४४५ धावा लावल्या.