Join us

IND vs AUS : 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री मारणाऱ्या Devdutt Padikkal च्या पदरीही भोपळा

यशस्वी पाठोपाठ देवदत्त पडिक्कलही अपयशी, कमबॅक मॅचमध्ये २३ चेंडू खेळूनही उघडता नाही आलं खातं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 09:40 IST

Open in App

AUS vs IND, 1st Test, Devdutt Padikkal Dismissed For A 23 Ball Duck Josh Hazlewood : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पर्थ कसोटी सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा फोल ठरलीये. सलामीवीर यशस्वी जैस्वाल खातेही न उघडता परतला. टीम इंडियानं अगदी स्वस्तात पहिली विकेट गमावल्यावर देवदत्त पडिक्कल मैदानात उतरला. टीम इंडियात वाइल्ड कार्ड एन्ट्रीसह त्याला कमबॅकची एक संधी मिळाली होती. साई सुदर्शन आणि ऋतुराज गायकवाड यांना बाजूला ठेवून टीम मॅनेजमेंटनं देवदत्तवर विश्वास टाकला. पण हा विश्वास सार्थ ठरवण्यात तो कमी पडला. कमबॅकच्या सामन्यात त्याच्या पदरीही भोपळा पडला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पर्थ कसोटी सामन्यात २३ चेंडू खेळूनही त्याला खाते उघडता आले नाही.

शुबमन गिलच्या दुखापतीनंतर टीम इंडियात वाइल्ड कार्ड एन्ट्री, पण... 

जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या चेंडू मारण्याचा देवदत्त पडिक्कलचा प्रयत्न फसला. चेंडू बॅटची कड घेऊन यष्टिरक्षक कॅरीच्या हाती गेला. भारतीय संघाच्या धावफलकावर १४ धावा असताना देवदत्तच्या रुपात टीम इंडियाने दुसरी विकेट गमावली. देवदत्त पडिक्कल याने याच वर्षी मार्चमध्ये धर्मशालाच्या मैदानात रंगलेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले होते. त्यानंतर शुबमन गिलच्या दुखापतीमुळे पुन्हा त्याला कमबॅकची संधी मिळाली. पण पहिल्या डावात तो या संधीच सोन करण्यास चुकला.

भारत 'अ' संघाकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यात लक्षवेधी कामगिरी, मग टीम इंडियात मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री

देवदत्त पडिक्कल याने याआधी एक कसोटी सामना खेळला होता. ज्यात त्याने अर्धशतकही झळकावले होते. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याने ६५ धावांची खेळी केली होती. भारत अ संघाकडून खेळताना केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन या मंडळींना मागे टाकत त्याने टीम इंडिया वाइल्ड कार्ड एन्ट्री मारली होती. शुबमन गिलच्या दुखापतीमुळे त्याची टीम इंडियात एन्ट्री झाली. एवढेच नाही तर पर्थच्या कसोटी सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान मिळाले. पण दमदार कमबॅक करून संधीच सोन कऱण्यात तो अपयशी ठरल्याचे दिसून आले..    

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघदेवदत्त पडिक्कलआॅस्ट्रेलिया