AUS vs IND : स्मृतीनं षटकार मारत साजरी केली फिफ्टी; जेमीसोबत विक्रमी भागीदारीचाही साधला डाव

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निर्णायक टी-२० सामन्यात स्मृती-जेमीची दमदार भागीदारी अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 14:57 IST2026-02-21T14:55:03+5:302026-02-21T14:57:07+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
AUS vs ENG Smriti Mandhana 33rd T20I Fifty Record Highest 2nd Wicket Partnerships With Jemimah Rodrigues For India vs Australia in WT20Is | AUS vs IND : स्मृतीनं षटकार मारत साजरी केली फिफ्टी; जेमीसोबत विक्रमी भागीदारीचाही साधला डाव

AUS vs IND : स्मृतीनं षटकार मारत साजरी केली फिफ्टी; जेमीसोबत विक्रमी भागीदारीचाही साधला डाव

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अ‍ॅडलेड येथील ओव्हलच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात स्मृती मानधनाने आपल्या बॅटमधील धमक दाखवत दमदार अर्धशतक झळकावले. उत्तुंग षटकार मार तिने आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील ३३ व्या अर्धशतकाला गवसणी घातली. एवढेच नाही तर तिने जेमिमा रॉड्रिग्जच्या साथीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी भागीदारीचा रेकॉर्डही सेट केला आहे. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
 

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यातील टी-२० मालिकेत दोन्ही संघ प्रत्येकी १-१ सामना जिंकला असून अ‍ॅडलेड ओव्हलच्या मैदानात मालिका कुणाच्या नावे होणार याचा फैसला होणार आहे. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना शेफाली वर्माच्या रुपात भारतीय संघाने पहिली विकेट गमावली. धावफलकावर १९ धावा असताना पहिली विकेट गमावली. मग तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जेमी आणि सलामीची बॅटर स्मृती या दोघींची जोडी जमली. या दोघींनी आपला जुना विक्रम मागे टाकत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून दुसऱ्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारीचा नवा रेकॉर्ड सेट केला.

स्मृती-जेमी जोडीची शतकी भागीदारी

स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज जोडीनं भारतीय महिला संघाचा  डाव सावरताना दुसऱ्या विकेटसाठी ८२ चेंडूत १२१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. स्मृती या सामन्यात शतकी डाव साधेल असे वाटत होते. पण ८२ धावांवर तिच्या खेळीला ब्रेक लागला. तिने या खेळीत ५५ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकार मारले. ती माघारी फिरल्यावर जेमिनं आपलं अर्धशतक पूर्ण केले.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून दुसऱ्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारीचा रेकॉर्ड

  • १२१  धावा* स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज, अ‍ॅडलेड, २०२६ 
  • ५७ धावा – स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्स, कॅरारा, २०२१
  • ५५ धावा – वेदा कृष्णमूर्ती आणि स्मृती मानधना, अ‍ॅडलेड, २०१६
     

Web Title: AUS vs ENG Smriti Mandhana 33rd T20I Fifty Record Highest 2nd Wicket Partnerships With Jemimah Rodrigues For India vs Australia in WT20Is