Join us

AUS v SL : एका हातात चेंडू, दुसऱ्या हातात स्टम्प; श्रीलंकेचा खेळाडू तरीही करू शकला नाही Run Out

श्रीलंकेला दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही दारूण पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 21:27 IST

Open in App

श्रीलंकेला दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही दारूण पराभव पत्करावा लागला. पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यातील शतकवीर डेव्हिड वॉर्नरने आजही लंकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याला स्टीव्ह स्मिथची तोलामोलाची साथ मिळाल्यानं ऑस्ट्रेलियानं या सामना 9 विकेट्सनं जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात स्मिथला बाद करण्याची सोपी संधी लंकेच्या खेळाडूनं गमावली. पण, लंकेच्या खेळाडूचा हा प्रताप सोशल व्हायरल झाला आहे. 

वॉर्नरच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं पहिल्या सामन्यात 233 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लंकेला 9 बाद 99 धावा करता आल्या. दुसऱ्या सामन्यात लंकेनं शतकी वेस ओलांडली, परंतु विजयासाठी ती पुरेशी ठरली नाही. दनुष्का गुणथिलका ( 21) आणि कुसल परेरा (27) हे वगळता लंकेच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. ऑस्ट्रेलियाच्या बिली स्टॅनलेक, पॅट कमिन्स, अ‍ॅश्टन अ‍ॅगर  आणि अ‍ॅडम झम्पा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. लंकेचा संपूर्ण संघ 19 षटकांत 117 धावांत माघारी परतला.

दुसऱ्या सामन्यातही वॉर्नरची फटकेबाजी पाहायला मिळाली. पण, यावेळी त्याच्या जोडीला स्मिथही होता. स्मिथनं 36 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीनं नाबाद 53 धावा केल्या. वॉर्नरने 41 चेंडूंत 9 चौकारांसह नाबाद 60 धावा केल्या. स्मिथला बाद करण्याची संदाकनने गमावली. 

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :आॅस्ट्रेलियास्टीव्हन स्मिथडेव्हिड वॉर्नरश्रीलंका