Join us  

Atal Bihari Vajpayee: अटलजींनी गांगुलीला बॅटवर लिहून दिला होता ' हा ' भावनिक संदेश

भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार होता. दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघाने वाजपेयी यांची भेट घेतली होती. त्यावेळी वाजपेयी यांनी भारताचा कर्णधार सौरव गांगुलीला एक बॅट भेट म्हणून दिली होती. या बॅटवर वाजपेयी यांनी एक भाविनिक संदेश लिहिला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 3:13 PM

Open in App
ठळक मुद्देभारतीय संघांतील खेळाडूंनी एका बॅटवर सह्या केल्या आणि ती बॅट वाजपेयी यांना भेट दिली होती.

नवी दिल्ली : अटलबिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा भारतामध्ये बऱ्याच नवीन गोष्टी घडल्या होत्या. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील संबंध सुधारण्यावरही त्यांनी भर दिला होता. त्याचवेळी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार होता. दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघाने वाजपेयी यांची भेट घेतली होती. त्यावेळी वाजपेयी यांनी भारताचा कर्णधार सौरव गांगुलीला एक बॅट भेट म्हणून दिली होती. या बॅटवर वाजपेयी यांनी एक भाविनिक संदेश लिहिला होता.

भारतीय संघांतील खेळाडूंनी एका बॅटवर सह्या केल्या आणि ती बॅट वाजपेयी यांना भेट दिली होती. त्यावेळी वाजपेयी यांनीही भारतीय संघाला एक बॅट भेट म्हणून दिली होती. वाजपेयी यांनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाला बॅटवर लिहून दिले होते की, 'खेल ही नहीं, दिल भी जीतिए। शुभकामनाएं'.

टॅग्स :अटल बिहारी वाजपेयीसौरभ गांगुलीभारत