पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अली हा सध्या वेस्ट इंडिज येथे सुरू असलेल्या कॅरेबियन प्रीमिअऱ लीगमध्ये ( CPL) खेळत आहे. सीपीएलमधील पदार्पणाच्या सामन्यात त्यानं मॅचविनींग नाबाद 47 धावांची खेळी केली होती. पण, त्यानंतर त्याला पुढील चार सामन्यांत साजेसा खेळ करता आला नाही. त्यात त्यानं एका सामन्यात चक्क प्रतिस्पर्धी गोलंदाजाला मारण्यासाठी बॅट उगारली होती. त्याची गंभीर दखल घेताना पाकिस्तानी फलंदाजाला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Breaking : कुस्तीपटू विनेश फोगाटला कोरोना
विराट-अनुष्काच्या 'गुड न्यूज'नं नोंदवला विक्रम; जगात ठरले अव्वल!
आसिफ अली सीपीएलमध्ये जमैका थलाव्हाज संघाचे प्रतिनिधित्व करतो आणि गयाना वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं ही चूक केली. त्याला बाद करणाऱ्या गोलंदाज किमो पॉलला मारण्यासाठी त्यानं बॅट उगारली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अनेकांनी त्याला ट्रोल केलं. किमो पॉलनंही त्याच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली होती.
वॉरियर्सविरुद्ध जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या आसिफ अलीला 8व्या षटकात किमो पॉलनं माघारी पाठवले. पॉलच्या गोलंदाजीवर पुल मारण्याच्या प्रयत्नात तो लाँग ऑनवर कर्णधार ग्रीनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. पेव्हेलियनमध्ये परतत असताना त्यानं पॉलवर बॅट उगारली. त्यानं पॉलच्या तोंडाजवळून बॅट फिरवली. पॉलला ती बॅट लागली असती तर तो गंभीर जखमी झाला असता. या कृतीबद्दल त्याला 20 टक्के मॅच फी दंड म्हणून भरावा लागणार आहे.