विराट-अनुष्काच्या 'गुड न्यूज'नं नोंदवला विक्रम; जगात ठरले अव्वल!

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी गुरुवारी त्यांच्याकडे गुड न्यूज असल्याचे जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 08:06 PM2020-08-28T20:06:41+5:302020-08-28T20:07:11+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli and Anushka Sharma become the most liked celebrity couple ever | विराट-अनुष्काच्या 'गुड न्यूज'नं नोंदवला विक्रम; जगात ठरले अव्वल!

विराट-अनुष्काच्या 'गुड न्यूज'नं नोंदवला विक्रम; जगात ठरले अव्वल!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी गुरुवारी त्यांच्याकडे गुड न्यूज असल्याचे जाहीर केले. 2017 मध्ये विराट-अनुष्कानं इटलीत मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केलं. त्यानंतर त्यांच्या घरी पाळणा हलणार असल्याच्या चर्चा अनेकदा उठल्या. पण, आज दोघांनी अधिकृतपणे त्यांच्या घरी पाहूणा येणार असल्याचे जाहीर केले. 'आम्ही दोनाचे तीन झालोय,' असं दोघांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. जानेवारी २०२१ मध्ये घरी पाळणा हलणार असल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली आहे. त्यांच्या या गुड न्यूजनं एक वेगळाच विक्रम नावावर केला. 

हार्दिक अऩ् विराटसह लॉकडाऊनमध्ये भारताच्या पाच खेळाडूंनी दिली आनंदाची बातमी! 

CSKचा कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू भारतीय संघाचा सदस्य, डझनभर सदस्यांना लागण? 

IPL 2020 : CSKचा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह; आता आयपीएल 2020 होणार रद्द?

विराट-अनुष्काच्या गुड न्यूजच्या इंस्टाग्राम पोस्टवर 24 तासांत 15.3 मिलियन लाईक्सचा पाऊस पडला. गोड बातमी दिल्यानंतर सर्वाधिक लाईक्स मिळवणारे ते जगातील अव्वल कपल ठरले आहेत. यापूर्वा ही विक्रम अमेरिकन मॉडेल गिगी हॅडीग हीच्या प्रेग्नन्सी न्यूजच्या पोस्टला 8.2 मिलियन लाईक्स मिळाले होते, तर जस्टीन बिबरच्या साखरपुड्याच्या पोस्टवर 13.4 मिलियन लाईक्स होते. अमेरिकन गायक सेलेना गोमेझ हीच्या फ्लोरेन्स वेकेशन फोटोवर 14.2 मिलियन लाईक्स होते आणि WWE स्टार ड्वेन जॉन्सनच्या लग्नाच्या फोटोला 14.6 मिलियन लाईक्स होते. विराटच्या पोस्टवर 1 कोटी, तर अनुष्काच्या पोस्टवर 5 कोटी लाईक्स आले आहेत.

 

चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातील सदस्याला कोरोना; MS Dhoniचं टेंशन वाढलं

Video : केव्हीन ओ'ब्रायननं खेचला असा षटकार की करून घेतलं स्वतःचं नुकसान

IPL 2020 : मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी; खेळाडूंसाठी नियमच बदलला 

Web Title: Virat Kohli and Anushka Sharma become the most liked celebrity couple ever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.