Yograj Singh on Abhishek Sharma Batting vs PAK : अभिषेक शर्मानं पाकिस्तान विरुद्ध केलेल्या वादळी खेळीनंतर माजी क्रिकेटर आणि सिक्सर किंग युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी स्फोटक बॅटरसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. छोट्या फॉरमॅटमध्ये सर्वात मोठी खेळी करून तो टी- क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गिल-अभिषेक जोडी जमली! योगराज सिंग म्हणाले, २५० धावांच टार्गेट असले तरी....
भारत-पाक यांच्यातील लढतीनंतर IANS ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भारतीय टी-२० संघाचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांच्या कामगिरीवर भाष्य केले. योगराज सिंग म्हणाले की, "शुबमन गिल आणि अभिषेक शर्माचा फॉर्म पाहता टीम इंडिया २५० धावांचाही पाठलाग अगदी सहज करू शकेल, असे वाटते. त्यासाठी या जोडीला किमान १५ षटके मैदानात थांबावे लागेल. या दोघांवर खूप काही अवलंबून आहे. अभिषेक शर्मानं १२-१५ षटके मैदानात थांबण्यावर फोकस करावा. शुबमन गिल दोन वेळा एकाच प्रकारच्या चेंडूवर बाद झाला. ही चूक त्याने सुधारण्याची गरज आहे. असा सल्लाही माजी क्रिकेटरनं भारताच्या सलामी जोडीला दिलाय.
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
अभिषेक शर्मानं टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या वादळी खेळीचा नजराणा पेश करत अल्पावधित खास छाप सोडलीये. आतापर्यंत २१ सामन्यात त्याने २ शतके झळकावली आहेत. तो आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या टी-२० क्रमवारीत अव्वलस्थानावर आहे. हा पठ्या भविष्यात छोट्या फॉरमॅटमधील सर्वात मोठी खेळी करेल, अशी भविष्यवाणी योगराज सिंग यांनी केलीये. ते म्हणाले की, ज्या दिवशी अभिषेक शर्मा २० षटके मैदानात थांबेल त्या दिवशी तो २०० धावाचा टप्पाही पार करेल, असे मला वाटते.
युवाचा चेला; पहिल्या चेंडूपासून गोलंदाजावर तुटून पडण्याचा तोरा!
अभिषेक शर्मा हा युवराज सिंगच्या तालमीत तयार झालेला पठ्ठ्या आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने जलद अर्धशतकी खेळीसह गुरुचा अर्थात युवीचा विक्रम मोडला. पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० सामन्यात भारताकडून सर्वात जलद अर्धशतक झळकवण्याचा विक्रम आता त्याच्या नावे झाला आहे. अभिषेक हा पहिल्यापासून गोलंदाजावर तुटून पडतो. फक्त षटकार चौकार नाही तर एकेरी दुहेरी धावांवर भर देत खेळी बहण्याचा सल्ला युवी त्याला सातत्याने देत असते.