Join us

PAK vs SL : 'डबल पंजा' पॅटर्नमुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!

श्रीलंका हा आशिया कप स्पर्धेतील टीम इंडियानंतर दुसरा सर्वात यशस्वी संघ

By सुशांत जाधव | Updated: September 23, 2025 17:23 IST

Open in App

Pakistan vs Sri Lanka, Super Fours, 15th Match : आशिया चषक २०२५ स्पर्धेत पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन संघ स्पर्धेतील अस्तित्व कायम ठेवण्यासाठी अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर एकमेकांना टक्कर देताना दिसतील. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये दोन्ही संघातील हेड टू हॅड रेकॉर्ड पाहिला तर पाकिस्तानचा संघ हा श्रीलंकन संघाच्या पुढे दिसतो. पण 'डबल पंजा' पॅटर्नमुळे लंकेचा पेपर यावेळी सोपा वाटतोय. त्यामुळे पाकला नापास होण्याचा धोका असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. इथं एक नजर टाकुयात काय आहे तो पॅटर्न अन् पाकिस्तासाठी ते किती आव्हानात्मक ठरेल, त्यासंदर्भातील खास गोष्ट

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

श्रीलंका हा आशिया कप स्पर्धेतील टीम इंडियानंतर दुसरा सर्वात यशस्वी संघ

आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानचा संघ हा मैदानातील कामगिरीशिवाय नौटंकीमुळेच चर्चेत राहिलाय. आता श्रीलंकेविरुद्धच्या आरपारच्या लढाईत तरी ते जोर दाखवणार की इथंही फुसका बार ठरणार अशी चर्चा क्रिकेटवर्तुळात रंगली आहे. पाकिस्तान संघाचा श्रीलंकेविरुद्ध टी-२० रेकॉर्ड भारी असला तरी तो जमाना पुराना झालाय. श्रीलंकेच्या संघाने पाकविरुद्ध जबरदस्त कमबॅक करत आपला रेकॉर्ड सुधारल्याचे आकडेवारीवरुन दिसते. एवढेच नाही तर साखळी फेरीतील दोन्ही संघाच्या कामगिरीचा विचार केला तर श्रीलंकेचा संघ हा पाकिस्तानवर भारी ठरतो. कारण आपल्या गटातील ते टॉपर आहेत. याशिवाय भारतीय संघानंतर आशिया कप स्पर्धेतील हा सर्वात यशस्वी संघ आहे. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तान संघावर पुन्हा ढेपाळण्याची वेळ येईऊ शकते.  

PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

'डबल पंजा पॅटर्न' अन् पाक समोरील मोठं आव्हान

श्रीलंकेच्या संघाने आंतरारष्ट्रीय टी-२० मधील मागील पाच सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. त्यात यंदाच्या हंगामात श्रीलंकेच्या संघातील पाच शिलेदार जोमात खेळत आहेत. त्यांची आकडेवारी ही पाकला कोमात नेण्याजोगी आहे. मागील सलग पाच विजय अन् लंकेच्या ताफ्यातील पाच तगडे फलंदाज  हा 'डबल पंजा' पॅटर्न पाकसाठी आव्हाने निर्माण करणारा असेल. श्रीलंकेच्या ताफ्यातून कुसल मेंडीस याने ४ सामन्यात १२२ धावा करत यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. धावांसाठी संघर्ष करणाऱ्या दासुन शनाकानं मागच्या सामन्यात आपल्यातील धमक दाखवलीये. सलामीवीर पथुम निसंकाही कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. फलंदाजीत हे त्रिकूट पाकिस्तानवर भारी ठरू शकते. गोलंदाजीत लंकेचा पुष्पा अर्थात वानिंदू हसरंगा आणि नुवान तुषारा हे महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील. लंकेच्या ताफ्यातील हे पाच खेळाडू पाकसाठी धोक्याची घंटा ठरू शकतात. 

टॅग्स :आशिया कप २०२५एशिया कपटी-20 क्रिकेटपाकिस्तानश्रीलंका