Join us

IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)

आशिया कप स्पर्धेआधीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये भारत-पाक कॅप्टनला बाउन्सर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 17:37 IST

Open in App

Asia Cup 2025  Suryakumar Yadav vs Salman Ali Agha : आशिया कप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या हायहोल्टेज सामन्याआधी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने मोठं वक्तव्य केले आहे. आम्ही मैदानात आक्रमक अंदाजातच उतरतो, असे सांगत पाकिस्तानविरुद्धही हाच बाणा दिसेल, असे तो म्हणालाय. भारत-पाक यांच्यातील आशिया कप स्पर्धेतील लढत ही १४ सप्टेंबरला दुबईच्या मैदानात रंगणार आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ला अन् त्यानंतर भारत-पाक यांच्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर पहिल्यांदाच दोन देशातील संघ क्रिकेटच्या मैदानात समोरासमोर येणार आहेत. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

आशिया कप स्पर्धेआधीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये भारत-पाक कॅप्टनला बाउन्सर

आशिया कप स्पर्धेला सुरुवात होण्याआधी स्पर्धेत सहभागी ८ संघांच्या कर्णधारांनी संयुक्त पत्रकार परिषदेत भाग घेतल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानी संघाचे नेतृत्व करणाऱ्या  सलमान आगा या दोघांना दोन्ही देशांतील राजकीय पार्श्वभूमीचा दाखला देत तुम्ही मैदानात उतरण्याआधी खेळाडूंना काही सूचना केल्या आहेत का? असा प्रश्न विचारला. यावर सूर्यकुमार यादवनं थेट मत मांडताना आक्रमक अंदाजात खेळण्यावरच भर दिला. यावर सलमान अली आगा यानेही रिप्लाय दिला. मैदानात उतरण्याआधी भारत-पाक संघाच्या कर्णधारांच्या खास 'बोलंदाजी'चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

स्टार क्रिकेटरनं शेअर केली साराह सोबतच्या साखरपुड्याची गोष्ट; रोमँण्टिक फोटो व्हायरल

नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

"आम्ही प्रत्येक वेळी आक्रमकतेसह मैदानात उतरतो. आक्रमकतेशिवाय क्रिकेट खेळताच येऊ शकत नाही.", असे म्हणत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही याच अंदाजात मैदानात उतरु, असे सूर्यकुमार यादवनं स्पष्ट केले. पुन्हा क्रिकेटमधील कमबॅकसाठी उत्सुक आहे, असेही तो यावेळी म्हणाला. सूर्यानं आपलं मत व्यक्त केल्यावर पाकिस्तान संघाटा कर्णधार सलमान अली आगानं वाकड्यात शिरण्याचा प्रकार केल्याचे दिसून आले.

अन् जे काही आहे ते.... पाक कॅप्टन वाकड्यात शिरला? नेमकं काय म्हणाला सलमान अली आगा 

सूर्यकुमार यादव याच्या वक्तव्यावर सलमान अली आगानं वाकड्यात शिरत रिप्लाय दिल्याचे पाहायला मिळाले. तो म्हणाला की, जे कुणी आक्रमक अंदाज दाखवणार असतील त्यांचे स्वागत आहे. पण ही आक्रमकता फक्त मैदानापर्यंतच राहू दे." त्याचे हे वक्तव्य फुकचा अहंकार दाखवणारे आहे, अशा आशयाच्या कमेंट सोशल मीडियावर उमटताना दिसत आहेत. कारण सूर्यकुमार यादवनं क्रिकेटच्या मैदानात आक्रमकता दाखवायलाच हवी, असे म्हटले होते.  सलमान अली आगानं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी सूर्याला रिप्लाय दिला. 

टॅग्स :आशिया कप २०२५भारत विरुद्ध पाकिस्तानसूर्यकुमार यादवभारतीय क्रिकेट संघ