Join us

Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला

मॅच आधी दोन्ही संघातील खेळाडूंनी वाहिली युवा क्रिकेटरच्या वडिलांना श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 23:16 IST

Open in App

Asia Cup 2025;  2 Days After Father's Death Dunith Wellalage Returns To Play vs Bangladesh  : श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील लढतीनं आशिया कप स्पर्धेतील सुपर फोरच्या लढतींना सुरुवात झाली. बांगलादेशच्या संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात श्रीलंकन खेळाडू दंडावर काळ्या फिती बांधून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. साखळी फेरीतील अफगाणिस्तान विरुद्धच्या लढतीनंतर श्रीलंकन ऑलराउंडर दुनिथ वेल्लालागे (Dunith Wellalage) याच्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी समजली होती. त्यामुळेच बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील मॅच आधी दोन्ही संघातील खेळाडूंनी श्रीलंकन युवा खेळाडूच्या वडिलांसाठी एक मिनिटांचे मौन बाळगत श्रद्धांजली वाहिल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नाही तर संघातील खेळाडूंसोबत तोही मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

दु:खाचा डोंगर कोसळला अन् तो दोन दिवसांत पुन्हा देशासाठी खेळायला मैदानात उतरला

अफगाणिस्तान विरुद्धच्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात २२ वर्षीय श्रीलंकन ऑलराउंडर दुनिथ वेल्लालागे याच्या शेवटच्या षटकात मोहम्मद नबीनं स्फोटक खेळी करताना सलग ५ षटकार मारले होते. मैदानात वाईट वेळ अनुभवल्यानंतर मॅचनंतर या क्रिकेटरवर दुख:;चा डोंगर कोसळल्याची बातमी मिळाली. दु:खाचा डोंगर कोसळ्यावरही या युवा खेळाडूनं सुपर फोरमधील महत्त्वाच्या लढतीचा विचार करून देशासाठी पुन्हा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकन संघाचा कोच जयसूर्या आणि संघ व्यवस्थापनाने एका मागून एक अघटीत घटनांटा सामना करणाऱ्या खेळाडूला पाठिंबा देत या परिस्थितीतही त्याच्यावर भरवसा दाखवला ही देखील एक मोठी गोष्टच या सामन्यात पाहायला मिळाली.

टीम इंडियातील 'क्वीन'चा मोठा पराक्रम! जलद शतकी खेळीसह किंग कोहलीचा विक्रम मोडत बनली भारताची टॉपर

विकेटचा रकाना कोरा, पण एक महत्त्वपूर्ण कॅच घेतला

श्रीलंकेच्या डावात दुनिथ वेल्लालागे बॅटिंगला आला. पण एकही चेंडूचा सामना न करता तो नॉनस्ट्राइक वरुनच नाबाद परतला. गोलंदाजीत ४ षटकात त्याने ३६ धावा खर्च केल्या. त्याला एकही विकेट मिळाली नाही. पण त्याने जो निर्णय घेतला तो कौतुकास्पद असाच आहे. या मॅचमध्ये हसरंगाच्या गोलंदाजीवर त्याने सेट बॅटर सैफ हसनचा महत्त्वपूर्ण झेल टिपला. बांगलादेशच्या या सलामीवीराने ४५ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. आतापर्यंतच्या टी-२० कारकिर्दीत या युवा गोलंदाजाने ६ सामन्यातील ६ डावात ७ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. ९ धावा खर्च करून ३ विकेट्स ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.  

टॅग्स :आशिया कप २०२५एशिया कपश्रीलंकाबांगलादेशटी-20 क्रिकेट