Asia Cup 2025, PAK vs UAE 10th Match : आशिया कप २०२५ स्पर्धेतील 'अ' गटातील साखळी फेरीतील शेवटचा सामना पाकिस्तान आणि UAE यांच्यात नियोजित आहे. सामन्याची वेळ झाली तरी या सामन्यासाठी पाकिस्तानी खेळाडू स्टेडियमवर आले नव्हते. 'करो वा मरो' अशा लढतीत खेळायचं की, नाही यासंदर्भात चर्चा करण्यासाठी वेळ मागत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सामना एक तास पुढे ढकलण्याची विनंती केली होती. नेमकी कुणासोबत चर्चा सुरुये अन् टीम इंडियानं हँडशेकनंतर काय आहे पाकिस्तान संघाचं हे सोंग जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियाची ती कृती अन् पाकची नौटंकी
टीम इंडियाविरुद्धच्या पराभवापेक्षा पाकिस्तान संघाला सूर्कुमार यादव अँण्ड कंपनीने हस्तांदोलन न केल्याची गोष्ट चांगलीच जिव्हारी लागली होती. या प्रकरणात पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) थेट सामनाधिकारी अँडी प्राइक्रॉफ्ट यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. त्यांच्या मते प्राइक्रॉफ्ट यांनी "हँडशेक वाद" प्रकरणात भारताची बाजू घेतलीये. त्यामुळे त्यांना हटवण्यात यावे. जर तसे केले नाही तर आम्ही आशिया कप स्पर्धेतून माघार घेऊ, अशी धमकी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं PCB ला या प्रकरणात ठेंगा दाखवल्यावर UAE विरुद्धच्या मॅचआधी होणाऱ्या पत्रकार परिषद रद्द करून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नव्या सोंगाला सुरुवात झाली. UAE विरुद्ध खेळायचं की, नाही यासंदर्भातील चर्चेला उशीर होतोय अस सांगत त्यांनी नियोजित वेळेत बदल करून सामना एक तास पुढे ढकलण्याची विनंती केली. आता हे नेमकं चर्चा कुणाशी करत होते? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल.
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
मॅच खेळायची की नाही त्यासंदर्भात कुणासोबत सोबत चर्चा सुरु होती?
UAE विरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तान संघाने आशिया कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा माहोल निर्माण केला. पण चर्चेचा दाखला देत दुसऱ्या बाजूला खेळाडू स्टेडियमवर पोहचले. PCB प्रवक्ता आमिर मीर यांनी गद्दाफी स्टेडियमवर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी जे आशियाई क्रिकेट परिषदेचेही अध्यक्ष आहेत ते माजी PCB अध्यक्ष रमीज राजा आणि नजम सेठी यांच्यासोबत चर्चा करत आहेत. या चर्चेनंतर UAE विरुद्ध खेळायचं की नाही ते चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले.
...अन् पाकची धमकी पोकळ ठरली!
UAE विरुद्धच्या मॅचआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या आजी माजी अध्यक्षांमध्ये काय अन् कोणत्या मुद्याभोवती चर्चा झाली ते गुलदस्त्यातच आहे. पण पाक संघ हॉटेलमधून निघाल्यामुळे ही चर्चा सकारात्मक झाली अन् त्यामुळे पाकची धमकी पोकळ ठरली, हे दिसून आले. आता मैदानात उतरुन ते धमक दाखवणार की, UAE डाव साधणार ते बघण्याजोगे असेल.