IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

UAE विरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीआधी पाकिस्तानच्या ताफ्यातून एक मोठा  निर्णय घेण्यात आलाय. नेमकं काय घडलं? जाणून घेऊया सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 21:06 IST2025-09-16T21:00:46+5:302025-09-16T21:06:41+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2025 Pakistan Cancel Pre Match Press Confrence Ahead Of UAE Clash No Reason Given For This | IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 Asia Cup 2025 Pakistan Cancel Pre Match Press Confrence Ahead Of UAE Clash : आशिया चषक २०२५ स्पर्धेतील भारतीय संघाविरुद्धच्या पराभवानंतर हस्तांदोलनाच्या मुद्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं IND vs PAK सामन्यातील मॅच रेफरी अँडी पाइक्रॉफ्ट (Andy Pycroft) यांना हटवण्याची मागणी केली होती. जर तसे झाले नाही तर आम्ही आशिया चषक स्पर्धेतून माघार घेऊ अशी धमकीही देण्यात आली होती. ICC नं ही मागणी फेटाळल्यावर PCB काय निर्णय घेणार? अशी चर्चा रंगली होती. आता त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आलीये. UAE विरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीआधी पाकिस्तानच्या ताफ्यातून एक मोठा  निर्णय घेण्यात आलाय. नेमकं काय घडलं? जाणून घेऊया सविस्तर...

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

'करो वा मरो'च्या लढती आधी पाक संघानं घेतला हा निर्णय

आशिया चषक स्पर्धेतील 'सुपर फोर'मध्ये प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानसाठी पुढचा सामना  'करो वा मरो' असा झाला आहे. UAE संघाविरुद्ध चुकून जरी पराभवाचा सामना करावा लागला तर ते स्पर्धेतून आउट होतील. या लढती आधी पाकिस्तानच्या संघाने मॅच आधी नियोजित पत्रकार परिषद रद्द केली. यामागचं कारण त्यांनी स्पष्ट केलेले नाही. हे प्रकरण टीम इंडियाविरुद्धच्या हस्तांदोलन प्रकरणाशी जोडले जात आहे. स्पर्धेतून बहिष्कार टाकण्याची भाषा करणाऱ्या PCB नं पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकून UAE विरुद्ध मैदानात उतरण्याचे ठरवल्याचे दिसते. 

IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...

नो दोस्ती... ओन्ली क्रिकेट! IND vs PAK यांच्यातील मॅचनंतर गाजला हस्तांदोलन न करण्याचा मुद्दा

रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवण्यात आला. भारतीय संघाने अगदी रुबाबात हा सामना जिंकला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या सामन्याला भारतातून विरोध झाला. ही गोष्ट लक्षात घेऊन टीम इंडियातील खेळाडूंनी मॅच दरम्यान पाकिस्तान संघातील खेळाडूंपासून लांब रहाणेच पसंत केले. ना टॉस वेळी दोन्ही कॅप्टनमध्ये हस्तांदोलन झालं ना सामना संपल्यावर ही औपचारिकता दिसली. या मुद्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आक्षेपही घेतला. पण आयसीसीने जे घडलं त्यात चुकीचं काही नाही, अशी भूमिका स्पष्ट करत पाक क्रिकेट बोर्डाला ठेंगा दाखवला. 

यजमान UAE संघ अशक्य वाटणारी गोष्ट करून दाखवणार का? 

आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने सलग दोन विजयासह सुपर फोरमध्ये एन्ट्री मारली आहे. 'अ' गटातून दुसरा संघ कोण? हे चित्र पाकिस्तान आणि यूएई यांच्यातील सामन्यानंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे 'अ' गटातील १७ सप्टेंबरला रंगणाऱ्या सामन्याला महत्त्वप्राप्त झाले आहे. यूएईचा संघ स्पर्धेत मोठा उलटफेर करून दाखवण्यात यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.
 

Web Title: Asia Cup 2025 Pakistan Cancel Pre Match Press Confrence Ahead Of UAE Clash No Reason Given For This

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.