Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

टीम इंडियापाठोपाठ 'अ' गटातून पाकिस्तानची सुपर फोरमध्ये एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 01:01 IST2025-09-18T00:51:30+5:302025-09-18T01:01:37+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2025 Pakistan Beat UAE And Enter Super 4 Set Another India vs Pakistan Clash | Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2025 Pakistan Beat UAE And Enter Super 4 : आशिया चषक स्पर्धेत खेळणार नाही असा माहोल निर्माण करून लेट मैदानात एन्ट्री मारलेल्या पाकिस्तान संघाने दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात UAE च्या संघाला पराभूत केले आहे. या सामन्यातील विजयासह 'अ' गटातून टीम इंडियापाठोपाठ पाकिस्तानच्या संघानं सुपर फोरमध्ये एन्ट्री मारली आहे. यूएईचा संघ आशिया कप स्पर्धेतून आउट झाल्यामुळे आता सुपर फोरमध्ये पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यात सामना रंगल्याचे पाहायला मिळणार आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

फखर झमानच्या अर्धशतकाशिवाय शाहीन शाह आफ्रिदीच्या खेळी ठरली टर्निंग पॉइंट

दुबईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात UAE संघाचा कर्णधार मुहम्मद वसीम याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  जुनैद सिद्दीकी  याने पाकिस्तानला धक्क्यावर धक्के देत कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. यूएईच्या संघासमोर पाकिस्तान संघ अडचणीत सापडला असताना फखर झमान याने अर्धशतक झळकावले. पण सिमरनजीत सिंग यांने त्याची विकेट घेत मोठा अडथळा दूर केला. अखेरच्या षटकात शाहीन शाह आफ्रिदीनं पुन्हा मोठी फटकेबाजी केली.  त्याने १४ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने केलेल्या नाबाद २९ धावांच्या जोरावर पाकिस्तानच्या संघाने निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात १४६ धावांपर्यंत मजल मारली. गोलंदाजीत संघाचा हुकमी एक्का असणारा आफ्रिदी सलग दुसऱ्या सामन्यात बॅटिंगमध्ये चमकला अन् त्याची ही खेळी मॅचला कलाटणी देणारी ठरली.

Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा

UAE च्या कॅप्टनसह सलामीवीर अलीशान शराफू स्वस्तात माघारी अन्...

पाकिस्तानच्या संघाला १४६ धावांवर रोखत UAE च्या संघाने सुपर फोरमध्ये एन्ट्री मारण्याचा पेपर बऱ्यापैकी सोपा केला होता. पण सलामीवीरांच्या फ्लॉपशोमुळे संघ अडचणीत सापडला. अलीशान शराफू आणि कर्णधार मुहम्मद वसीम यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण ते दोघेही पॉवरप्लेमध्ये माघारी फिरले. आघाडीचे तीन फलंदाज तंबूत परतल्यावर राहुल चोप्रा ३५(३५) आणि ध्रुव परशर २०(२३) जोडीनं प्रयत्न केला. पण मोक्याच्या क्षणी धावगती वाढवण्याच्या वेळी ते माघारी फिरले अन् सामना पाकिस्तानच्या बाजूनं झुकला. गोलंदाजीत पाक संघाकडून शाहीन शाह आफ्रिदी, हारिस राउफ आणि अब्रार अहमद यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. सईम अयूब आणि कर्णधार सलमान आगा यांनीही आपल्या खात्यात १-१ विकेट जमा केली.  

सुपर फोरमध्ये पुन्हा रंगणार भारत-पाक यांच्यातील सामना

आशिया कप स्पर्धेत भारत-पाक यांच्यातील साखळी फेरीतील सामन्यानंतर हँडशेक प्रकरण चांगलेच गाजले. आता सुपर फोरमध्ये पुन्हा या दोन संघातील लढत पाहायला मिळणार आहे. रविवारी २१ सप्टेंबरला 'अ' गटातील पहिल्या क्रमांकावरील संघ अन् दुसऱ्या क्रमांकावरील संघ यांच्यातील लढत दुबईच्या मैदानात नियोजित आहे. जी भारत-पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात येईल.
 

Web Title: Asia Cup 2025 Pakistan Beat UAE And Enter Super 4 Set Another India vs Pakistan Clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.