Join us

Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव

बांगलादेशकडून T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तो तिसरा गोलंदाज आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 21:00 IST

Open in App

Aisa Cup 2025, PAK vs BAN, Taskin Ahmed Dismissed Sahibzada Farhan First Over And Claim His 100th Wicket In T20Is : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानबांगलादेश यांच्यातील सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. बांगलादेशचा कार्यवाही कर्णधार जाकेर अली याने या सामन्यात नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत तस्कीन अहमदनं पहिल्याच षटकात पाकिस्तानला मोठा दणका दिला. या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने सलामीवीर साहिबजादा फरहान याला झेलबाद केले. संघाला दमदार सुरुवात करून देताना त्याने या विकेटसह पहिल्याच षटकात 'शतकी' डाव साधला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पहिल्याच षटकात 'शतकी' डाव

तस्कीन अहमद याने संघाला दमदार सुरुवात करून देताना पहिल्याच षटकात 'शतकी' डाव साधला. साहिबजादाच्या रुपात त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये शंभर विकेट्सचा पल्ला गाठला. बांगलादेशकडून अशी कामगिरी करणारा तो तिसरा गोलंदाज ठरलाय. या कामगिरीसह त्याने शाकीब अल हसन आणि मुस्तफिझुर यांनी बांगलादेशच्या संघाकडून १०० पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.  पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी तस्कीन याने ८१ सामन्यातील ८० डावात गोलंदाजी करताना ९९ विकेट्स घेतल्या होत्या १६ धावा खर्च करून ४ विकेट्स ही त्याची या फॉरमॅटमधील सर्वोच्च कामगिरी आहे. आता ८२ व्या सामन्यात त्याने शतक साजरे करत खास क्लबमध्ये एन्ट्री मारली आहे. 

IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर

बांगलादेशकडून T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

बांगलादेशच्या संघाकडून टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम हा मुस्तफिझुर रहमानच्या नावे आहे. त्याने १५० विकेट्सचा टप्पा गाठला आहे. शाकीब अल हसनच्या खात्यात १४९ विकेट्सची नोंबद आहे. या दोगांपाठोपाठ आता तस्कीन अहमद १०० विकेट घेणारा तिसरा गोलंदाज ठरालय. 

English
हिंदी सारांश
Web Title : Taskin Ahmed's 100 T20I Wickets: Bangladesh bowler shines against Pakistan.

Web Summary : Taskin Ahmed achieved his 100th T20I wicket against Pakistan, becoming the third Bangladeshi to reach this milestone after Shakib Al Hasan and Mustafizur Rahman. He dismissed Sahibzada Farhan in the first over.
टॅग्स :आशिया कप २०२५एशिया कपपाकिस्तानबांगलादेशटी-20 क्रिकेट