Asia Cup 2025 PAK vs BAN Comedy Of Errors And Pakistan Miss A Run Out Chance Video : क्रिकेटच्या मैदानात सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचा नजराणा पेश करणारे संघ अन् खेळाडू कोण? हा प्रश्न तसा व्यक्ती सापेक्ष आहे. भारतीय संघाशिवाय कुणाला जॉन्टीसह दक्षिण आफ्रिकेचा संघ आठवेल. कुणी क्रिकेटच्या मॉडर्न जमान्यातील जॉन्टी अर्थात ग्लेन फिलिप्सच्या अफलातून क्षेत्रक्षणाला दाद देईल. कुणाला मॅच जिंकण्याची संधी नाही हे स्पष्ट झाल्यावरही शेवटच्या चेंडूपर्यंत जीव तोडून पडून क्षेत्ररक्षण करणारे कांगारुंच्या ताफ्यातील गडी आठवतील. पण याउलट ज्यावेळी खराब क्षेत्ररक्षणासंदर्भातील मुद्दा चर्चेत येतो त्यावेळी मात्र एकच नाव आघाडीवर असते ते म्हणजे पाकिस्तान.बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात तेच घडलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
फिल्डिंग बघून वाटते हे चुकूनच फायनलमध्ये पोहचले
क्रिकेटच्या मैदानातील खराब क्षेत्ररक्षणामुळे पाकिस्तानचा संघ नेहमीच चर्चेत राहिला आहे. आशिया कप स्पर्धेत बांगलादेशच्या संघाला नमवून त्यांनी फायनल गाठलीये. या चर्चेशिवाय दुबईच्या मैदानातील त्यांनी रन आउटची गमावलेली आयती संधी चर्चेचा विषय ठरतीये. त्यांच्या फिल्डिंगचा दर्जा बघून ते चुकूच फायनलमध्ये पोहचलेत, असेच वाटते. नेमकं काय घडलं? व्हिडिओसह जाणून घेऊयात सविस्तर
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
दोन्ही फलंदाजात स्ट्राइक एन्डवर, पण तरीही पाकला रन आउट करणं नाही जमलं
पाकिस्तानच्या संघानं दिलेल्या १३६ धावांचा पाठलाग करताना ४ षटकात बांगलादेशच्या संघानं एका विकेट्सच्या मोबदल्यात २३ धावा केल्या होत्या. शाहीनं शाह आफ्रीदी पाचवे षटक घेऊन आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर तौहीद हृदोय याने बॅकवर्ड पाँइटच्या दिशेनं फटका मारला. सईम अयूबनं उत्तम फिल्डिंग करत चेंडू अडवला. पण त्यानंतर पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षणाचा खरा दर्जा समोर आला. या चेंडूवर नॉन स्ट्राइकवरील सैफ हसन स्ट्राइक एन्डला पोहचला होते. बांगलादेशचे दोन्ही फलंदाजात एकाच एन्डला आल्यावर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राइक एन्डला त्याला धावबाद करण्यासाठी एकाने नव्हे तर दोघा तिघांनी गर्दी केली. पण एकालाही संधीचा फायदा घेत रन आउटचा डाव साधता आला नाही.जे घडलं ते पाकिस्तानच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा आणखी एक नमुना पेश करणारे होते. बांगलादेशनंही याचा फायदा उठवला नाही. दुसऱ्याच चेंडूवर तौहीद हृदोय झेलबाद होऊन परतला. पण पाकिस्तानच्या फिल्डिंगचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतोय.
गादीवर कॅचिंग प्रॅक्टिस करणाऱ्यांकडून काय अपेक्षा
२०२४ मध्ये पाकच्या ताफ्यातील खेळाडूंचे काही फोटो अन् व्हिडिओ व्हायरल झाले होते. यात पाकच्या संघातील खेळाडू मैदानात गादी टाकून प्रॅक्टिस करताना दिसले होते. यावरून ते ट्रोलही झाले होते. संघ बदलला पण त्यांच्यात काही सुधारणा झाल्याचे दिसत नाही. सुमार दर्जाच्या क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत ते आघाडीवर आहेत अन् राहतील, असेच काहीसे चित्र बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा पाहायला मिळाले.
Web Title : PAK vs BAN: मैदान पर कॉमेडी, पाकिस्तान ने आसान रन-आउट का मौका गंवाया
Web Summary : एशिया कप में पाकिस्तान की फील्डिंग की खामियां जारी हैं। बांग्लादेश के खिलाफ रन-आउट का आसान मौका गंवा दिया। दोनों बल्लेबाज एक ही छोर पर थे, फिर भी पाकिस्तान चूक गया। उनकी खराब फील्डिंग फाइनल में पहुंचने पर सवाल उठाती है।
Web Title : PAK vs BAN: Comedy on field, Pakistan misses easy run-out chance
Web Summary : Pakistan's fielding woes continue as they hilariously missed a run-out chance against Bangladesh in Asia Cup. Despite both batters at the same end, Pakistan failed to capitalize. Their poor fielding raises questions about their final appearance and preparation.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.