SL vs AFG, Asia Cup 2025 Kusal Perera’s Stunning Grab Sends Darwish Rasooli : श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात आशिया चषक २०२४ स्पर्धेतील साखळी फेरीतील अखेरच्या सामना अबू धाबीतील झायेद क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्याचे पाहायला मिळाले. सुपर फोरचे चित्र स्पष्ट होण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सामन्यात श्रीलंकेच्या ताफ्यातील कुशल परेरा याने कुठं ही उभं करा कॅच सोडणार नाही, या तोऱ्यात क्षेत्ररक्षणाचा सर्वोत्तम नमुना पेश केला. स्लिपमध्ये अफगाणिस्तानसा सलामीवीर गुरबाझचा अप्रतिम झेल टिपत आधी त्याने संघाला पहिलं यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर सीमारेषेवर षटकाराचे रुपांत झेलमध्ये करत त्याने फिल्डिंगच्या जोरावर संघाला यश मिळवून दिल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...अन् परेराच्या अप्रतिम झेलसह दरविश रसूलीचा खेळ खल्लास
नवुमा थुसारा याने सुरुवातीला दिलेल्या धक्क्यातून सावरताना अफगाणिस्तानच्या संघाने १० षटकानंतर ३ बाद ६३ धावा केल्या होत्या. इब्राहिम झादरान आणि दरविश रसूली ही जोडी मैदानात खेळत होती. ११ व्याषटकात दुष्मंथा चमिरा गोलंदाजीला आला. त्याने टाकलेल्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर दरवशील याने मोठाा फटका खेळला. या चेंडूवर त्याला ६ धावा मिळाल्याच होत्या. पण कुसल परेरानं उत्तम क्षेत्ररक्षण करत फक्त चेंडू अडवला नाही तर सहा धावा मिळवून देणाऱ्या चेंडूवर अफगाणिस्तानला धक्का दिला. सीमारेषेवर परेरानं जबरदस्त झेल टिपला अन् वसूलीचा खेळ खल्लास झाला.
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
चेंडू हवेत उडवला, स्वत: सीमारेषेबाहेर गेला अन् आत येऊन कॅच क्लियर केला
डीप थर्ड मॅनवर फिल्डिंग करत असलेल्या कुसल परेरानं क्षेत्ररक्षणातील कौशल्य दाखवून देताना आधी उडी मारून चेंडू पकडला. पण सीमारेषेच्या अगदी जवळ आलोय हे लक्षात आल्यावर त्याने चेंडू हवेत उडवला. क्षणात सीमारेषेबाहेर जाऊन पुन्हा तो मैदानात आला अन् झेल यशस्वीरित्या पूर्ण केला. त्याने घेतलेला झेल पाहून फलंदाजासह प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले. हा झेल २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सूर्यकुमार यादवनं घेतलेल्या कॅचची आठवण करून देणारा होता. पण परेराचा झेलच्या तुलनेत सूर्यकुमार यादवनं पकडलेला झेल कित्येकपटीने भारी ठरतो.
या कारणामुळं सूर्याचा झेल ठरतो सर्वात भारी!
परेरानं घेतलेला झेल हा सूर्यकुमार यादवच्या आयकॉनिक कॅचप्रमाणेच आहे. पण सूर्याच्या झेलला तोड नाही. कारण सूर्यकुमार यादव लाँग-ऑनच्या थोडं आत उभा होता. डेविड मिलरनं ताकदीचा फटका मारला तेव्हा चेंडू सीमारेषेकडे वेगानं जात असताना सूर्यानं वेगाने धावत चपळाईनं तो कॅच पकडला होता. सूर्याच्या कॅचमध्ये स्प्रिंट + टाइमिंग + बॉडी बॅलन्स याचा कमालीचा संगम पाहायला मिळाला होता. त्यामुळे परेराचा झेल भारी असला तरी तो सूर्याच्या कॅचसमोर फिका ठरतो.