Asia Cup 2025 India vs Pakistan Final Suryakumar Yadav Out Or Not Out : दुबईच्या मैदानात रंगलेल्या आशिया कप स्पर्धेतील सामन्यात पाकिस्तानच्या संघानं दिलेल्या १४७ धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. यंदाच्या हंगामात टीम इंडियाला दमदार सुरुवात करुन देणारा अभिषेक शर्मा ६ चेंडूत फक्त एका चौकारासह ५ धावा करून माघारी फिरला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या सूर्यकुमारनंही एक ओव्हर खेळायच्या आत तंबूचा रस्ता धरला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सूर्यकुमार आउट की नॉट आउट?
भारताच्या डावातील तिसऱ्या षटकात शाहीन शाह आफ्रिदी गोलंदाजी करत होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवनं गोलंदाजीवर पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा याने त्याचा झेलबाद टिपला. हा झेल वादग्रस्त ठरताना दिसतोय. सोशल मीडियावर सूर्यकुमार आउट की नॉट आउट अशी चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
नेमकं काय घडलं?
शाहीन शाह आफ्रिदीनं स्लोओवर टाकलेल्या चेंडूवर सूर्यकुमार यादवनं इनफिल्डच्या वरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण टायमिंग चुकलं अन् झेलची निर्माण झालेल्या संधीनंतर मिड-ऑफवरून सलमान आगानं धडपडत झेल टिपला. कॅचनंतर सूर्यकुमार मैदानावर उभा राहिला. मैदानातील पंचांनी या विकेटसाठी तिसऱ्या पंचाची मदत घेतली. थर्ड अंपायरनं रिप्ले पाहून कॅच योग्य असल्याचं घोषित करत सूर्यकुमार यादवला बाद ठरवलं. सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांना मात्र हा झेल झालेला नाही असं वाटतं. तशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. याआधी भारत पाकिस्तान यांच्यातील लढतीत संजू सॅमसन याने घेतलेल्या कॅचनंतर वाद निर्माण झाला होता. फखर झमानला आउट नसताना तिसऱ्या पंचांनी आउट दिलं अशा प्रतिक्रिया पाकिस्तानमधून उमटल्या होत्या. आता भारतीय क्रिकेट चाहत्यांकडून सोशल मीडियावर सुर्यकुमार यादवच्या विकेटसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे.
Web Summary : In the Asia Cup final, Suryakumar Yadav's controversial catch by Pakistan's captain sparked debate. Fans question the validity of the dismissal, recalling a similar incident with Sanju Samson. Third umpire's decision is under scrutiny.
Web Summary : एशिया कप फाइनल में सूर्यकुमार यादव के विवादास्पद कैच पर विवाद। प्रशंसकों ने आउट होने की वैधता पर सवाल उठाए, संजू सैमसन के साथ हुई घटना को याद किया। थर्ड अंपायर का निर्णय जांच के दायरे में है।