Asia Cup 2025 India vs Pakistan Final : आशिया चषक स्पर्धेतील अंतिम सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवण्यात येत आहे. पाकिस्तान विरुद्धच्या फायनल सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुखापतीमुळे अष्टपैलू हार्दिक पांड्या मेगा फायनलला मुकणार आहे. त्याच्या जागी रिंकू सिंहची टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झालीये. दुसरीकडे अर्शदीपच्या जागी शिवम दुबे कमबॅक करतोय.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार यादव), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन
साहिबजादा फरहान, फखर झमान, सईम अयूब, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हरिस यष्टीरक्षक), मोहम्मद नवाझ, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हारिस राउफ, अबरार अहमद.