आशिया कप स्पर्धेत भारत-पाक यांच्यातील सामना निश्चित झाल्यावर आता हा सामना कोणत्या मैदानात खेळवण्यात येणार तेही ठरले आहे. आशिया क्रिकेट परिषदेकडून शनिवारी आशिया कप स्पर्धेतील सामने कोण कोणत्या मैदानावर खेळवण्यात येणार यासंदर्भातील घोषणा करण्यात आलीये. टी-२० प्रकारात खेळवण्यात येणाऱ्या आशिया स्पर्धेतील सामने हे ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमीरात (UAE) च्या मैदानातील दुबई आणि आबूधाबीच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दुबईच्या मैदानात रंगणार भारत-पाक यांच्यातील सामना
नेहमीच क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेणारा भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी १४ सप्टेंबरला रंगणार आहे. ते आधीच समोर आले होते. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार याची पुष्टी झाली आहे. आशिया कप स्पर्धेत भारत पाकिस्तान दोन्ही संघ एकाच गटात असून साखळी फेरीतील लढतीनंतर सुपर फोरमध्येही दोन्ही संघ समोरासमोर येऊ शकतात.
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
भारतीय संघ कधी करणार आशिया कप स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात?
भारतीय संघ १० सप्टेंबर रोजी युएईच्या संघाविरुद्धच्या लढतीसह या स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात करेल. भारतीय संघाचे सर्व सामने दुबईच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. 'अ' गटात भारत, पाकिस्तान, युएई आणि ओमान या संघाचा समावेश आहे. दुसरीकडे 'ब' गटात श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग या चार संघांचा समावेश आहे.