Asia Cup 2025 IND vs PAK, Suryakumar Yadav Avoid Handshake With Pakistan Captain Salman Ali Agha : भारत-पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक स्पर्धेतील साखळी फेरीतील सहावा सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यासंदर्भात देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध खेळू नये, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. IND vs PAK यांच्यातील सामन्याधी जो माहोल निर्माण झालाय त्याची भारतीय संघातील खेळाडूंनाही चांगलीच कल्पना आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवनं पाक विरुद्धच्या मॅच आधी टॉस वेळी जी परंपरा जपली जाते ती मोडत भारतीयांची भावना जपण्याचा प्रयत्न केला. टॉस वेळी सूर्यकुमार यादवची कृतीनं सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
परंपरा मोडत सूर्यानं भारतीयांची भावना जपली
आशिया चषक स्पर्धाच नव्हे तर कोणत्याही स्पर्धेतील मॅचमध्ये टॉस नंतर दोन्ही संघातील कर्णधार एकमेकांसोबत हस्तांदोलन करतात. क्रिकेटच्या मैदानात वर्षांनुवर्षे ही परंपरा चालत आलीये. पण सूर्यकुमार यादवनं ही परंपरा मोडत भारतीयांच्या भावना जपल्याचे पाहायला मिळाले. टॉस झाल्यावर सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानी कर्णधारासोबत हातमिळवणी करणं टाळलं. सोशल मीडियावर या प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
भारतीय कर्णधारानं आधीच स्पष्ट केली होती आपली भूमिका
इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, सूर्यकुमार याादव याने टॉस आधीच टीम मॅनेजमेंटला पाकिस्तान कर्णधारासोबत परंपरेनुसार, हात मिळवणी करणार नाही, हे स्पष्ट केले होते. तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ठरवा, असेही कर्णधाराने संघातील आपल्या सहकाऱ्यांना सांगितले होते, असा उल्लेखही या वृत्तामध्ये करण्यात आला आहे.
भारत -पाक सामन्याला विरोध; एकाही खेळाडूला नव्हती पाक विरुद्ध खेळण्याची इच्छा
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने पाक विरुद्ध क्रिकेटचा सामना खेळू नये, अशी मागणी केली जात होती. पण सरकारच्या निर्णयाचं पालन करत असल्याचे सांगत बीसीसीआयने या स्पर्धेसाठी तयार झालोय, असे स्पष्ट केले. पाक विरुद्धच्या मॅचआधी सुरेश रैनानंही मोठा गौफ्यस्फोट केला होता. भारतीय संघातील एकाही खेळाडूला पाकिस्तान विरुद्ध सामना खेळण्याची इच्छा नाही, असे तो म्हणाला होता.
Web Title: Asia Cup 2025 India Captain Suryakumar Yadav Avoid Handshake With Pakistan Captain Salman Ali Agha During Toss IND vs PAK Asia Cup 2025 Watch Videeo
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.