Asia Cup 2025 IND vs PAK Suryakumar Yadav Found Guilty Of Breaching ICC Code Of Conduct : आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC ) भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला आचारसंहिता (Code of Conduct) भंग केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. आशिया कप स्पर्धेतील साखळी फेरीतील पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या लढतीनंतर सूर्यकुमार यादव याने पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताीय लष्कराने केलेली कारवाई यासंदर्भात वक्तव्य केले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं केली होती तक्रार
१४ सप्टेंबर रोजी दुबईच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यानंतर भारतीय कर्णधाराने केलेल्या विधानावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आक्षेप घेतला होता. याप्रकरणी त्यांनी ICC कडे तक्रार केली होती. गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी झाल्यावर ICC नं भारतीय कर्णधारावर दंडात्मक कारवाई केली आहे. सामन्याच्या मानधनातील ३० टक्के रक्कम कपात करण्याची शिक्षा त्याला देण्यात आली आहे.
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
PCB नं सूर्याच्या या वक्तव्यावर घेतलेला आक्षेप
ESPNcricinfo च्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सूर्यकुमार यादवांच्या त्या वक्तव्यांकडे लक्ष वेधले जिथे त्यांनी म्हटले होते, की “आम्ही आजचा विजयाच लष्कराला समर्पित करतो.” पाकिस्तानच्या आरोपानंतर रिची रिचर्डसन यांनी टीम इंडियाला यासंदर्भात ई मेल पाठवला होता. त्यानंतर सूर्यकुमार यादवनंही आपली बाजू मांडली होती. या प्रकरणात मॅच फीच्या रुपात दंडात्मक कारवाई करताना स्पर्धेतील उर्वरित सामन्यात कोणत्याही प्रकारचे राजकीय वक्तव्य करू नये, अशी ताकीदही सूर्यकुमार यादवला करण्यात आली आहे.