Sahibzada Farhan Celebrates Fifty With Firing Gun vs India : दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान (Sahibzada Farhan) याने अर्धशतकी खेळी केली. खरं तर पहिल्या षटकात तो खाते उघडण्याच्या आधी जाळ्यात सापडला होता. पण त्याचा कॅच सुटला अन् तो चांगलाच महागडा पडला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकच्या सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन!
साहिबजादा फरहान याने दोन कॅच सुटल्यावर अर्धशतक झळकावत संघाकडून सर्वोच्च धावसंख्या करण्याचा डाव साधला.अर्धशतकी खेळीनंतर पाकच्या सलामीवीरानं 'नापाक' सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. आशिया कप स्पर्धेत भारत-पाक यांच्यातील सामन्या संदर्भात आधीच तणावपूर्ण वातावरण आहे. त्यात या बहाद्दरानं सेलिब्रेशनसह आगीत तेल ओतण्याचा प्रकार केलाय. त्याच्या सेलिब्रेशनमुळे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसते.
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
व्हिडिओ आणि फोटो व्हायरल
पाकिस्तानच्या डावातील १० व्या षटकात अक्षर पटेल गोलंदाजी करत होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर एक उत्तुंग षटकार मारत साहिबजादा याने अर्धशतकाला गवसणी घातली. अर्धशतक साजरे केल्यावर त्याचा आनंद व्यक्त करताना बेभान सेलिब्रेशन करताना त्याने बॅटची बंदूक करून गोळ्या झाडल्याची कृती करत आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावर त्याच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होताना दिसत आहे.
सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
पाकिस्तानच्या ताफ्यातील सलामीवीराच्या या कृतीनंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघाने आशिया कप स्पर्धेत पाक विरुद्ध खेळू नये, अशी मागणी जोर धरली होती. यावर बीसीसीआय आणि सरकारला ट्रोलचा सामनाही करावा लागला. आता पाकिस्तानी फलंदाजाच्या कृतीनंतर पुन्हा सोशल मीडियावर भारत-पाक सामन्यासंदर्भात रोष व्यक्त होताना दिसतोय.
Web Title: Asia Cup 2025 IND vs PAK Pakistan's Sahibzada Farhan Celebrates Fifty With Firing Gun Celebration vs India Months After Pahalgam Terror Attack Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.