Asia Cup 2025 IND vs PAK Out Or Not Out Fakhar Zaman Wicket Controversy : आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोरमध्ये पुन्हा एकदा भारत -पाकिस्तान यांच्यात हायहोल्टेज सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकल्यावर पाकिस्तान संघ पहिल्यांदा फलंदाजीला मैदानात उतरला. पहिल्या तीन सामन्यात भोपळा पदरी पडलेल्या सईम अयूब ऐवजी पाकिस्तानच्या संघाकडून फखर झमानच्या रुपात सलामीवीराच्या रुपात नवा प्रयोग आजमावण्यात आला. हा प्रयोग प्रभावी ठरला नाही. कारण हार्दिक पांड्याने डावाच्या तिसऱ्या षटकातच त्याला तंबूचा रस्ता दाखवला. विकेटमागे संजू सॅमसन याने त्याचा कॅच घेतला. ही विकेट भारत-पाक यांच्यातील सामन्यात नवा वाद निर्माण करणारी ठरली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आधी खणखणीत चौकार, मग पांड्यानं चकवा दिला अन् संजून आपलं काम चोख बजावलं
अनुभवी डावखुऱ्या फलंदाजाने पाक संघाच्या डावाची सुरुवात करताना काही आकर्षक पठके मारले. पण ३ चौकारासह १५ धावा करून तो तंबूत परतला. पाकिस्तानच्या डावातील तिसऱ्या षटकात हार्दिक पांड्या गोलंदाजी करत होता. या षटकातील पहिला चेंडू निर्धाव टाकल्यावर दुसऱ्या चेंडूवर फखर झमान याने एक खणखणीत चौकार मारला. त्यानंतर पांड्यानं ऑफ कटर चेंडूवर पाक बॅटरला चकवा दिला. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर असणारा चेंडू मारण्याचा फखर झमानचा प्रयत्न फसला अन् चेंडू बॅटची कड घेऊन विकेट मागे गेला. संजूनं ही संधी विकेटमध्ये रुपांतरित केली.
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
मैदानातील पंचांनी थर्ड अंपायरच्या कोर्टात ढकलला चेंडू, भारताच्या बाजूनं लागला निकाल
संजूनं कॅच क्लीयर केलाय का? यासंदर्भात मैदानातील पंचांनी तिसऱ्या टेलिव्हिजन अंपायरची मदत घेतली. अन् हा निर्णय भारताच्या बाजूनं लागला. कॅच झाल्याची पुष्टी करत तिसऱ्या पंचांनी फलंदाजाला बाद ठरवले. हा निर्णय आल्यावर फखर झमान याने आश्चर्यचकित होत आउटच नव्हतो अशी रिअॅक्शन दिली. अन् सोशल मीडियावर पाक बॅटर OUT होता की NOT OUT अशी चर्चा रंगण्यास सुरुवात झाली.
Web Title: Asia Cup 2025 IND vs PAK Out or not out wicket controversy Fakhar Zaman shocked after tight Sanju Samson catch Hardik Pandya Over in Super 4
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.