पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

Asia Cup 2025, Ind Vs Pak: आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सुपर ४ लढतीवेळी मैदानामध्ये दोन्ही खेळांडूंमधील वातावरण तापलेलं दिसलं. तसेच शाब्दिक चकमकीही उडाल्या. याचदरम्यान, पाकिस्तानचा पराभव निश्चित झाल्यानंतर स्टेडियममध्येही भारतीय समर्थकांनी पाकिस्तानच्या पाठीराख्यांची खिल्ली उडवल्याचे व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 12:23 IST2025-09-22T12:23:18+5:302025-09-22T12:23:47+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2025, Ind Vs Pak: As soon as the defeat became apparent, Pakistani spectators started running away, Indian girl burst into the stadium, saying... | पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी केलेल्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये रविवारी झालेल्या सुपर ४ लढतीत भारतीय संघाने पाकिस्तानवर सहा गडी राखून मात केली होती. या लढतीत पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५ गडी गमावून १७१ धावा जमवल्या होत्या. भारतीय संघाने या आव्हाना ७ चेंडू आणि सहा गडी राखून सहज फडशा पाडला. यादरम्यान, मैदानामध्ये दोन्ही खेळांडूंमधील वातावरण तापलेलं दिसलं. तसेच शाब्दिक चकमकीही उडाल्या. याचदरम्यान, पाकिस्तानचा पराभव निश्चित झाल्यानंतर स्टेडियममध्येही भारतीय समर्थकांनी पाकिस्तानच्या पाठीराख्यांची खिल्ली उडवल्याचे व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत.

अशाच एका व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये भारतीय संघाची समर्थक असलेली एक महिला पाकिस्तानी प्रेक्षकांना ट्रोल करताना दिसत आहे. या महिलेने हिरवी साडी परिधान केली होती. तसेच हातामध्ये तिरंग्याची मॅचिंग करणाऱ्या बांगड्या घातल्या होत्या.


दरम्यान, पाकिस्तानचा पराभव निश्चित झाल्यानंतर पाकिस्तानी समर्थक स्टेडियमधमधून बाहेर जाऊ लागले. तेव्हा या महिलेने भाग भाग पाकिस्तान अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. तसेच ती हाताने पाकिस्तानी प्रेक्षकांना बाय बाय करत होती. त्यानंतर कुणीतरी या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. तसेच तो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 
  

Web Title: Asia Cup 2025, Ind Vs Pak: As soon as the defeat became apparent, Pakistani spectators started running away, Indian girl burst into the stadium, saying...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.