IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)

अभिषेकच्या खेळीबद्दल त्या दोघी नेमकं काय म्हणाल्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 02:42 IST2025-09-22T02:31:47+5:302025-09-22T02:42:33+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2025 IND vs PAK Abhishek Sharma Mother And Sister Komal Sharma On His First Ball Six Against Shaheen Afridi Watch Video | IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)

IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 Abhishek Sharma Mother And Sister Komal Sharma On His First Ball Six Against Shaheen Afridi : आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोरच्या लढतीत भारतीय संघाने पुन्हा आपला दबदबा दाखवून देत पाकिस्तानची जिरवली. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानच्या डावात अभिषेक शर्मानं पाकच्या सलामीवीराचे दोन झेल सोडले. फायदा उठवत त्याने अर्धशतकही ठोकले. त्यामुळे हे कॅच टीम इंडियाला भारी पडणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण धावांचा पाठलाग करताना अभिषक शर्मानं कॅच सोडल्याची भरपाई करताना पाकिस्तान गोलंदाजांना चांगलेच धुतले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

पाक विरुद्ध सर्वात जलद अर्धशतक झळकवण्याचा रेकॉर्ड

भारताच्या डावाची सुरुवातच त्याने शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर कडक सिक्सर मारून केली. हाच तोरा कायम ठेवत त्याने आंतरारष्ट्रीय टी-२० सामन्यात २४ चेंडूत अर्धशतक साजरे केले. या कामगिरीसह तो पाकिस्तान विरुद्धच्या टी-२० सामन्यात सर्वात जलद अर्धशतक झळकणारा भारतीय फलंदाज ठरला. संघाला विजयाची गॅरेंटी देणारी खेळी करताना अभिषेक शर्मानं ३९ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने १८९.७४ च्या सरासरीनं ७४ धावा कुटल्या.

IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)

अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन शाह आफ्रिदीची खिल्ली

अभिषेक शर्माची पाकिस्तान विरुद्धच्या खेळी पाहण्यासाठी त्याची आई  मंजू शर्मा आणि बहीण कोमल शर्मा यांनीही दुबईच्या स्टेडियमवर हजेरी लावली होती. अर्धशतक झळकवल्यावर अभिषेक शर्मानं आपल्या कुटुंबियांकडे पाहत खास अंदाजात सेलिब्रेशन केल्याचेही पाहायला मिळाले. टीम इंडियाच्या सलग चौथ्या विजयानंतर युवा स्फोटक सलामीवीराची आई मंजू शर्मा आणि  बहीण कोमल यांनी अभिषेकच्याखेळीवर खास प्रतिक्रिया दिली. यावेळी त्या दोघांनी पाकचा प्रमुख गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीची अप्रत्यक्षरित्या खिल्लीच उडवल्याचे पाहायला मिळाले. 

अभिषेकच्या खेळीबद्दल त्या दोघी नेमकं काय म्हणाल्या?

भारत-पाक यांच्यातील सामन्यानंतर स्पोर्ट्स जर्नलिस्ट विमल कुमार यांनी अभिषेक शर्माची आई आणि बहीण कोमल शर्मा यांना अभिषेक शर्माच्या खेळीबद्दल प्रश्न विचारला. यावेळी अभिषेक शर्माची बहीण कोमल म्हणाली की,  हा सामना पाहताना खूप मजा आली. पहिल्या चेंडूवर मारलेला षटकार डोळ्याचं पारण फेडणारा होता. तो याच माइंड सेटनं खेळतो अन् त्याला असे खेळताना पाहण्याची सवय झाली आहे, अशा शब्दांत डॉ. कोमल शर्मानं आपल्या भावाचं कौतुक केलं. तिच्या सूरात सूर मिळत आईनं षटकाराचा उल्लेख करत त्याने कुणाच्या गोलंदाजीवर षटकार मारलाय हे सर्वांना माहितीये.. असं म्हणत एका अर्थाने शाहीन शाह आफ्रिदीची खिल्लीच उडवली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची दुसरी मॅच पाहायला आले आहे, ही खास गोष्टी देखील अभिषेकच्या आईने यावेळी सांगितली. आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल असलेल्या भारतीय युवा सलामीवीराच्या खेळीसंदर्भात त्याची आई अन् बहीण यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

Web Title: Asia Cup 2025 IND vs PAK Abhishek Sharma Mother And Sister Komal Sharma On His First Ball Six Against Shaheen Afridi Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.