Join us

Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

आधी दोन विकेट्स घेतल्या अन् फिफ्टी ठोकत मारली खास क्लबमध्ये  एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 00:05 IST

Open in App

Aamir Kaleem Record Against T20 World Champion Team India : आशिया चषक स्पर्धेतील अबुधाबीच्या मैदानात रंगलेल्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात ओमानच्या आमिर कलीम  (Aamir Kaleem) नं ऐतिहासिक खेळी केली. भारतीय संघाने दिलेल्या १८८ धावांचा पाठलाग करताना या पठ्ठ्यानं अर्धशतक झळकावले. पूर्ण सदस्यीय संघासमोर अर्धशतकी खेळी करणारा तो ओमानचा पहिला फलंदाज ठरला आहे. एवढेच नाही या अर्धशतकी खेळीसह त्याने अनेक विक्रम सेट केले आहेत. हर्षित राणाच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका खेळताना हार्दिक पांड्याच्या सर्वोत्तम कॅचनं त्याच्या इनिंगला ब्रेक लावला. त्याआधी त्याने ४६ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६४ धावांची खेळी केली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

आधी दोन विकेट्स घेतल्या अन् फिफ्टी ठोकत मारली खास क्लबमध्ये  एन्ट्री

भारतीय संघाविरुद्ध आंतरारष्ट्रीय टी-२० मध्ये फक्त मोजक्या खेळाडूंनी दोन विकेट्स अन् फिफ्टीचा डाव साधला आहे. यात वेस्ट इंडिजचा डेवॉन ब्रावो, श्रीलंकेचा दसुन शनाका आणि शेन वॉटसन यांचा समावेश आहे. या यादीत आता ओमानच्या आमिर कलीमची एन्ट्री झाली आहे. कारकिर्दीतील दुसरे टी-२० अर्धशतक साजरे करण्याआधी  गोलंदाजीत ३ षटकात ३१ धावा खर्च करून त्याने २ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या होत्या.

IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?

असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

आमीर कलीम हा आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पूर्ण सदस्यीय संघाविरुद्ध अर्धशतकी खेळी करणारा सर्वात वयस्क खेळाडू ठरलाआहे. ४३ वर्षे आणि ३०३ दिवस वय असताना टीम इंडियाविरुद्ध त्याच्या भात्यातून अर्धशतक आले आहे. याआधी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावे होता. २०२१ मध्ये गेलनं ४१ वर्षे आणि २९४ दिवस वय असताना ऑस्ट्रेलिया विरुद्ध अर्धशतक ठोकले होते. या यादीत मोहम्मद नबी तिसऱ्या स्थानावरआहे. आशिया कप स्पर्धेतील ब गटातील साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध त्याने ४० वर्षे आणि २६० दिवस वय असताना अर्धशतक झळकावले आहे.

टॅग्स :आशिया कप २०२५एशिया कपभारतीय क्रिकेट संघ