Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!

संघ अडचणीत असताना जबरदस्त खेळीचा नजराणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 23:47 IST

Open in App

Asia Cup 2025 Tilak Varma Solid Fifty In Final Run Chase Against Pakistan : आशिया चषक स्पर्धेत युवा बॅटर तिलक वर्माच्या भात्यातून कडक अन् अविस्मरणीय अर्धशतक पाहायला मिळाले. दुबईच्या मैदानात रंगलेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ धावांचा पाठलाग करताना अडचणीत आला होता. कठीण परिस्थितीत तिलक वर्मानं पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करत संघाचा डाव सावणारी जबरदस्त खेळी केली. आधी त्याने संजू सॅमसनच्या साथीनं डाव सावरला. त्यानंतर शिवम दुबेच्या साथीनं त्यानं मॅच सेट करणारी खेळी करताना अर्धशतक झळकावले.  

तिलकच्या भात्यातून आली आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी

तिलक वर्मा याने आपल्या अल्प कारकिर्दीत २ शतके झळकावत छोट्या फॉरमॅटमध्ये खास छाप सोडलीये. आशिया कप स्पर्धेतील पहिल्या अर्धशतकासह त्याने टी-२० कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकावले. ही नाबाद अर्धशतकी खेळी आतापर्यंतच्या कोणत्याही खेळीपेक्षा अनमोल आहे. कारण फायनलचा सामना पाकिस्तानच्या बाजूनं झुकलाय असं वाटत असताना त्याने अर्धशतकी खेळीसह फक्त संघाला सावरलं नाही, तर पाकिस्तानला हरवण्यात पुढाकार घेतला. मॅटर मोठा असला की, कोहली उभा असतो, ही गोष्ट याआधी अनेकदा पाहायला मिळाली आहे. तिलक वर्माची खेळी ही कोहलीच्या खेळीची आठवण करुन देणारी होती. 

आशिया कप स्पर्धेत २०० पेक्षा अधिक धावा करणारा चौथा

आशिया कप स्पर्धेत पहिल्यांदाच भारतीय संघात संधी मिळालेल्या तिलक वर्मानं ही स्पर्धा गाजवली. ७ सामन्यातील ६ डावात त्याने ७१ च्या सरासरीसह १३१ च्या स्ट्राइक रेटनं २१३ धाव केल्या. या स्पर्धेत २०० धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला. या यादीत ७ सामन्यातील ७ डावात ३१४ धावांसह अभिषेक शर्मा ३१४ धावांसह टॉपला राहिला. श्रीलंकेच्या पथुम निसंका याने ६ सामन्यातील ६ डावात २२६१ तर पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान याने ७ सामन्यातील ७ डावात २०१७ धावा केल्या. सरासरीच्या बाबतीत तो सगळ्यात अव्वल ठरला. यावरून त्याची कामगिरी किती खास होती, तेच अधोरेखित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Tilak Varma's Fifty Saves India Against Pakistan in Asia Cup Final

Web Summary : Tilak Varma's solid fifty rescued India in the Asia Cup final against Pakistan. Facing a tough run chase, Varma's aggressive batting, first with Samson and then with Dube, stabilized the innings and brought India closer to victory with a memorable knock.
टॅग्स :आशिया कप २०२५एशिया कपभारत विरुद्ध पाकिस्तानतिलक वर्मा