Asia Cup 2025 Bangladesh Beat Afghanistan To Stay Alive In Super 4s Race : आशिया चषक २०२५ स्पर्धेतील नवव्या सामन्यात बांगलादेशच्या संघाने ८ विकेट्सनी विजय नोंदवत यंदाच्या हंगामातील सुपर फोरमध्ये एन्ट्री मारण्याच्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत. पहिल्यांदा फलंदाजी करताना बांगलादेशच्या संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोोबदल्यात १५४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्ततानचा संघ १४६ धावांत आटोपला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आता साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यानंतरच कळणार 'ब' गटातील 'सुपर फोर'मधील दोन संघ
अफगाणिस्तान विरुद्धच्या विजयासह बांगलादेशच्या संघाच्या खात्यात ३ सामन्यातील २ सामन्यातील विजयासह ४ गुण जमा झाले आहेत. श्रीलंकेच्या संघानेही सलग दोन विजयासह ४ गुण कमावले आहेत. साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात 'ब' गटातील श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्याचा निकाल या गटातून कोणते दोन संघ सुपर फोरमध्ये खेळताना दिसणार ते स्पष्ट होईल. जर अफगाणिस्तानच्या संघाने श्रीलंकेला पराभूत केले तर उत्तम नेट रनरेटच्या जोरावर ते सुपर फोरसाठी पात्र ठरतील. या परिस्थितीत श्रीलंका आणि बांगलादेश या दोन्ही संघातील एक संघ आगेकूच करेल. जर या सामन्यात श्रीलंकेनं बाजी मारली तर अफगाणिस्तान स्पर्धेतून आउट होईल. ब गटातून दोन जागेसाठी या तीन संघात तगडी फाईट अपेक्षित होती. त्यामुळेच हा डेथ ग्रुप ठरतो. तेच चित्र पाहायला मिळत आहे.
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...