Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...

अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर सुपर फोर गाठण्याची संधी;

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 00:34 IST2025-09-17T00:22:59+5:302025-09-17T00:34:32+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2025 Bangladesh Beat Afghanistan To Stay Alive In Super 4s Race Rahid Khan Lead Team Eyes On Sri Lanka | Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...

Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2025 Bangladesh Beat Afghanistan To Stay Alive In Super 4s Race : आशिया चषक २०२५ स्पर्धेतील नवव्या सामन्यात बांगलादेशच्या संघाने ८ विकेट्सनी विजय नोंदवत यंदाच्या हंगामातील सुपर फोरमध्ये एन्ट्री मारण्याच्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत. पहिल्यांदा फलंदाजी करताना बांगलादेशच्या संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोोबदल्यात १५४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्ततानचा संघ १४६ धावांत आटोपला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

बांगलादेशच्या सलामी जोडीची जबरदस्त सुरुवात, पण.. 

पहिल्यांदा फलंदाजी करताना बांगलादेशच्या संघाकडून सैफ हसन ३० (२८) आणि तांझीद हसन ५२ (३१) जोडीनं दमदार सुरुवात करून दिली.  राशिद खान याने ही जोडी फोडल्यावर बांगलादेश संघाची धावगती मंदावली. चांगली सुरुवात करणाऱ्या संघाला  निर्धारित २० षटकात अफगाणिस्तानच्या संघाने  १५४ धावांवर रोखले. राशिद खा आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. याशिवाय अझमतुल्लाह ओमरझाईनं एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली.  

 

BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

धावांचा पाठलाग करताना गडबडले

बांगलादेशच्या संघाने ठेवलेल्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत सुपर फोरमधील स्थान पक्के करण्याची चांगली संधी अफगाणिस्तानच्या संघाकडे होती. पण संघाची सुरुवातच खराब झाली. नसुम अहमद याने पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर अफगाणिस्तानचा सलामीवीर सेदीकुल्ला अटल  याला तंबूचा रस्ता दाखवला. संघाच्या धावफलकावर १८ धावा असताना इब्राहिम झादरानही ५ धावा करून तंबूत परतला. गुरबाझनं तग धरला. पण ३१ चेंडूत त्याने फक्त ३५ धावा केल्या. तो असताना अपेक्षित धावगती राखण्यात संघ कमी पडला.

ओमरझाईसह राशिद खाननं पल्लवित केली होती विजयाची आस, शेवटी अफगाणिस्ताच्या हातून निसटली मॅच 

अवघ्या ७७ धावांवर अफगाणिस्तानचा अर्धा संघ तंबूत परतला होता. अझमतुल्लाह ओमरझाईनं तुफान फटकेबाजी करत १६ चेंडूत ३० धावा करत संघाच्या आशा पल्लवित केल्या तो तंबूत परतल्यावर राशिद खान याने सूत्रे आपल्या हाती घेतली. नो लूक सिक्सर मारत कर्णधाराने खाते उघडले. तो जोपर्यंत मैदानात होता तोपर्यंत हा सामना अफगाणिस्तानकडे झुकेल, असे वाटत होते. पण अनुभवी मुस्तफिझुरनं त्याची विकेट घेतली अन् सामना बांगलादेशच्या बाजूनं वळवला. 

 साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यानंतरच कळणार 'ब' गटातील 'सुपर फोर'मधील दोन संघ

अफगाणिस्तान विरुद्धच्या विजयासह बांगलादेशच्या संघाच्या खात्यात ३ सामन्यातील २ सामन्यातील विजयासह ४ गुण जमा झाले आहेत. श्रीलंकेच्या संघानेही सलग दोन विजयासह ४ गुण कमावले आहेत. साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात 'ब' गटातील श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्याचा निकालवर या गटातून कोणते दोन संघ सुपर फोरमध्ये खेळणार यासंदर्भातील चित्र स्पष्ट होईल. बांगलादेशचा संघाने विजयासह आस कायम ठेवली असली तरी पराभूत झालेल्या अफगाणिस्तानचा संघाला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी आहे.  अफगाणिस्तानच्या संघाचे रनरेट हे बांगलादेश आणि श्रीलंकेपेक्षा उत्तम आहे. जर त्यांनी श्रीलंकेविरुद्धचा अखेरचा सामना जिंकला तर   उत्तम नेट रनरेटच्या जोरावर ते सुपर फोरसाठी पात्र ठरतील. या परिस्थितीत श्रीलंका आणि बांगलादेश यापैकी उत्तम नेट रन रेट असणारा संघ सुपर फोरमध्ये दिसेल.  हे समीकरण मॅच जिंकलेल्या बांगलादेशसाठी अधिकच धोक्याचे ठरु शकते. त्यामुळे ते आता श्रीलंकेच्या संघाने जिंकावे, अशी प्रार्थना करतील. कारण १८ सप्टेंबरचा साखळी फेरीतील शेवटचा सामना लंकेनं जिंकला तर अफगाणिस्तान स्पर्धेतून आउट होईल अन् लंकेपाठोपाठ बांगलादेशचा संघ सुपर फोरमध्ये पोहचेल.
 

Web Title: Asia Cup 2025 Bangladesh Beat Afghanistan To Stay Alive In Super 4s Race Rahid Khan Lead Team Eyes On Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.