Asia Cup 2025 All Teams Squad : सर्व संघ फायनल! जाणून घ्या ८ कॅप्टनसह कुणी कशी केलीये संघ बांधणी?

इथं एक नजर टाकुया आठ संघांच्या कर्णधारासह कोणत्या संघात कुणाला संधी मिळालीये त्यासंदर्भातील सविस्तर माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 17:55 IST2025-09-04T17:48:39+5:302025-09-04T17:55:35+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2025 All Teams Squad india Pakistan Sri Lanka Bangladesh UAE Afghanistan And All Captain | Asia Cup 2025 All Teams Squad : सर्व संघ फायनल! जाणून घ्या ८ कॅप्टनसह कुणी कशी केलीये संघ बांधणी?

Asia Cup 2025 All Teams Squad : सर्व संघ फायनल! जाणून घ्या ८ कॅप्टनसह कुणी कशी केलीये संघ बांधणी?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताच्या यजमानपदाखाली होणारी यंदाच्या आशिया कप स्पर्धेतील सामने हे युएईतील दोन मैदानात खेळवण्यात येणार आहेत. ९ सप्टेंबरपासून टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धात भारत आणि पाकिस्तान यांच्यासह  श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, हाँगकाँग, यूएई आणि ओमान या संघाचा समावेश आहे. स्पर्धेत सहभागी सर्वच्या सर्व ८ संघ फायनल झाले आहेत. इथं एक नजर टाकुया आठ संघांच्या कर्णधारासह कोणत्या संघात कुणाला संधी मिळालीये त्यासंदर्भातील सविस्तर माहिती 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

८ संघाची  दोन गटात विभागणी

आशिया कप स्पर्धेतील साखळी फेरीतील लढती या दोन गटात खेळवल्या जातील. भारतीय संघासह पाकिस्तान, युएई आणि ओमान हे संघ 'अ' गटात आहेत. दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि हाँगकाँग संघ 'ब' गटात आहे. आयसीसी टी-२० क्रमवारीत नंबर वन असलेला भारतीय संघाचा या स्पर्धेत दबदबा राहिला आहे. यंदाच्या हंगामातही सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ प्रबळ दावेदार मानला जातोय. इथं एक नजर टाकुयात टीम इंडियासह स्पर्धेतील संघांवर...

Asia Cup 2025 स्पर्धेआधी टी-२० मध्ये भारतीय फलंदाजांचा दबदबा; टॉप १० मध्ये या चौघांचा समावेश

आशिया कप २०२५ स्पर्धेत कोणत्या संघाचा कॅप्टन कोण?

  • भारत - सूर्यकुमार यादव
  • पाकिस्तान-    सलमान अली आगा
  • श्रीलंका _चरित असलंका
  • अफगानिस्तान - राशिद खान
  • बांगलादेश- लिटन दास
  • यूएई -मोहम्मद वसीम
  • हाँगकाँग- यासिम मुर्तझा
  • ओमान -जतेंदर सिंग
  • आशिया कपसाठी कुणी कशी केलेयी संघ बांधणी?

 

  • भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंह.
  • पाकिस्तान : सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर झमान, हॅरिस राउफ, हसन अली, हसन नवाझ, हुसेन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हॅरिस, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वसीम ज्यूनिअर, साहिबजादा फरहान, सईम अयूब, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी, सुफियान मोकिम.
  • श्रीलंका: चरिथ असलंका (कर्णधार), कुसल मेंडिस (विकेटकीपर), पथुम निसांका, कुसल परेरा, कामिल मिशारा, दसुन शनाका, कामेंदु मेंडिस, वानिंदु हसरंगा, नुवानिदु फर्नांडो, दुनिथ वेल्लागे, चामिका करुणारत्ने, महीश तीक्षणा, मथीशा पथिराना, नुवान तुषारा, दुष्मंथा चमीरा, बिनौरा फर्नांडो.
  • अफगानिस्तान : राशिद खान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाझ, इब्राहिम जादरान, दरविश रसूली, सेदिकुल्लाह अटल, अजमतुल्लाह उमरझाई, करीम जनत, मोहम्मद नबी, गुलबदीन नायब, शराफुद्दीन अशरफ, मोहम्मद इशाक, मुजीब उर रहमान, अल्लाह गजनफर, नूर अहमद, फरीद मलिक, नवीन-उल-हक, फजलहक फारूकी.
  • बांगलादेश : लिटन दास (कर्णधार), तंजीद हसन, परवेज हुसैन इमोन, सैफ हसन, तौहीद हिरदॉय, जेकर अली अनिक, शमीम हुसैन, काजी नुरुल हसन सोहन, शक महेदी हसन, रिशाद हुसैन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तंजीम हसन साकिब, तस्कीन अहमद, शोरफुल इस्लाम, शैफ उद्दीन.
  • हाँगकाँग: यासिम मुर्तझा (कर्णधार), बाबर हयात, जीशान अली, नियाजाकत खान मोहम्मद, नसरुल्ला राणा, मार्टिन कोएत्जी, अंशुमान रथ, कल्हण मार्क चल्लू, आयुष आशीष शुक्ला, मोहम्मद ऐजाज खान, अतीक उल रहमान इकबाल, किंचित शाह, आदिल महमूद, हारून मोहम्मद अरशद, अली हसन, शाहिद वासिफ, गजनफर मोहम्मद, मोहम्मद वहीद, अनस खान, एहसान खान.
  • ओमान: जतिंदर सिंग (कर्णधार), हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला, सुफियान यूसुफ, आशीष ओडेडेरा, आमिर कलीम, मोहम्मद नदीम, सुफियान महमूद, आर्यन बिष्ट, करण सोनावले, जिक्रिया इस्लाम, हसनैन अली शाह, फैसल शाह, मोहम्मद इमरान, नदीम खान, शकील अहमद, समय श्रीवास्तव.
  • यूएई : मोहम्मद वसीम (कर्णधार), अलीशन शराफू, आर्यंश शर्मा (विकेटकीपर), आसिफ खान, ध्रुव पराशर, ईथन डी’सूजा, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीकी, मतीउल्लाह खान, मोहम्मद फारूक, मोहम्मद जवदुल्लाह, मोहम्मद जोहेब, राहुल चोप्रा (विकेटकीपर), रोहिद खान, सिमरनजीत सिंग, सगीर खान.
     

Web Title: Asia Cup 2025 All Teams Squad india Pakistan Sri Lanka Bangladesh UAE Afghanistan And All Captain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.