Join us

Asia Cup 2023 स्पर्धेसाठी बाबर आजमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने जाहीर केला तगडा संघ

Asia Cup 2023, Pakistan Squad : आशिया चषक २०२३ स्पर्धा ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालवधीत पाकिस्तान व श्रीलंका येथे खेळवली जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 17:24 IST

Open in App

Asia Cup 2023, Pakistan Squad : आशिया चषक २०२३ स्पर्धा ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालवधीत पाकिस्तान व श्रीलंका येथे खेळवली जाणार आहे. BCCI ने भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिल्यानंतर ACC ने ही स्पर्धा पाकिस्तान व श्रीलंका येथे खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाकिस्तानात ४ व श्रीलंकेत ९ सामने होणार आहेत. आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानने बुधवारी त्यांचा संघ जाहीर केला आहे. निवड समिती प्रमुख इंझमाम-उल-हक यांनी ही घोषणा केली आहे. आशिया चषक स्पर्धेत खेळण्यापूर्वी हाच संघ अफगाणिस्तानविरुद्धी तीन सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे. 

India vs Pakistan सह वर्ल्ड कप स्पर्धेतील ९ सामन्यांच्या तारखेत बदल, पाहा पूर्ण वेळापत्रक

पाकिस्तान, भारत आणि नेपाळ अ गटात आहेत, तर ब गटात श्रीलंका, बांगलादेश व अफगाणिस्तानचा समावेश आहे. दोन्ही गटातील दोन अव्वल संघ सुपर ४ मध्ये खेळतील आणि त्यानंतर दोन अव्वल संघ फायनल खेळतील. वन डे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून आशिया चषक यंदा ५०-५० षटकांचा होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) मुलतान आणि लाहोर येथे आशिया चषक स्पर्धेचे ४ सामने खेळवणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना २ सप्टेंबरला कँडी येथे होण्याचा अंदाज आहे आणि त्यानंतर १० सप्टेंबरला सुपर ४ मध्ये उभय संघ पुन्हा समोरासमोर येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचा संघ ( अफगाणिस्तान मालिका आणि आशिया चषक ) -  बाबर आजम ( कर्णधार), फखर जमान, मोहम्मद रिझवान, शादाब खान, अब्दुल्लाह शफिक, फहीम अश्रफ, हॅरीस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाम उल  हक, मोहम्मद हॅरीस, मोहम्मद वासीम ज्युनियर, सौद शकिल, नसीम शाह, आघा सलमान, शाहिन आफ्रिदी, तय्याब ताहीर, उसामा मीर 

आशिया चषकाचे वेळापत्रक३० ऑगस्ट - पाकिस्तान वि. नेपाळ, मुलतान३१ ऑगस्ट - बांगलादेश वि. श्रीलंका, कँडी२ सप्टेंबर - पाकिस्तान वि. भारत, कँडी३ सप्टेंबर - बांगलादेश वि. अफगाणिस्तान, लाहोर४ सप्टेंबर - भारत वि. नेपाळ, कँडी५ सप्टेंबर - श्रीलंका वि. अफगाणिस्तान, लाहोर६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला१७ सप्टेंबर - फायनल  

टॅग्स :एशिया कप 2022पाकिस्तानबाबर आजम
Open in App