Video : मोहम्मद सिराज नव्हे, तर रोहित शर्माने आशिया चषक दुसऱ्याच खेळाडूकडे सोपवला 

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final Live : भारतीय संघाने विक्रमी आठव्यांदा आशिया चषक उंचावला...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 07:51 PM2023-09-17T19:51:23+5:302023-09-17T19:51:36+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final Live : The trophy lifting moment of team India after winning Asia Cup 2023, Rohit handed the trophy to Tilak and Kishan, Video | Video : मोहम्मद सिराज नव्हे, तर रोहित शर्माने आशिया चषक दुसऱ्याच खेळाडूकडे सोपवला 

Video : मोहम्मद सिराज नव्हे, तर रोहित शर्माने आशिया चषक दुसऱ्याच खेळाडूकडे सोपवला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final Live : भारतीय संघाने विक्रमी आठव्यांदा आशिया चषक उंचावला... मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेचा संघ १५.१ षटकांत ५० धावांत गडगडला. सिराजने ७-१-२१-६ अशी स्पेल टाकून हा सामना गाजवला. इशान किशन आणि शुबमन गिल या युवा जोडीने ६.१ षटकांत भारताला १० विकेट्स राखून विजय पक्का केला. मोहम्मद सिराजल सामनावीर म्हणून गौरविण्यात आले, तर कुलदीप यादव प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट ठरला. सिराजने त्याला मिळालेली बक्षीस रक्कम ग्राऊंड्समन्सना दिली. त्यांच्या मेहनतीमुळे आम्ही खेळू शकलो, असे तो म्हणाला. 


जसप्रीत बुमराहने पहिला धक्का दिल्यानंतर सिराजने कंबरडे मोडले. सिराजने ७-१-२१-६ अशी अप्रतिम स्पेल टाकली. हार्दिक पांड्याने ३ व जसप्रीतने १ विकेट घेतली.  भारताने १५.२ षटकांत श्रीलंकेला ५० धावांवर ऑल आउट केले आणि १० विकेट्स व २६३ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला.  माफक लक्ष्याचा पाठलाग करायला इशान किशन व शुबमन गिल ही युवा जोडी मैदानावर आली. या दोघांनी दमदार फटकेबाजी करून ६.१ षटकांत मॅच संपवली. इशान १७ चेंडूंत २२ धावांवर नाबाद राहिला, तर गिलनेही १९ चेंडूंत ६ चौकारांसह नाबाद २७ धावा केल्या. 


या विजयानंतर आशियाई क्रिकेट परिषदेचे ( ACC) अध्यक्ष जय शाह यांनी कर्णधार रोहित शर्माकडे ट्रॉफी दिली. रोहितने परंपरा कायम राखताना ती संघातील दुसऱ्या खेळाडूकडे दिली, पण तो दुसरा खेळाडू मोहम्मद सिराज नव्हता... रोहितने ट्रॉफी युवा खेळाडू तिलक वर्मा व इशान किशन यांच्याकडे सोपवली. त्यांच्या जल्लोषाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Web Title: Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final Live : The trophy lifting moment of team India after winning Asia Cup 2023, Rohit handed the trophy to Tilak and Kishan, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.