विराट कोहलीला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार दिल्याने गौतम गंभीर नाराज, सांगितलं कारण

Asia Cup 2023 IND vs PAK : टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) त्याच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 03:12 PM2023-09-12T15:12:17+5:302023-09-12T15:12:51+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2023 IND vs PAK : Gautam Gambhir bemused by Virat Kohli winning Man of the Match against Pakistan; explains why | विराट कोहलीला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार दिल्याने गौतम गंभीर नाराज, सांगितलं कारण

विराट कोहलीला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार दिल्याने गौतम गंभीर नाराज, सांगितलं कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2023 IND vs PAK : टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) त्याच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. प्रत्येक वेळी गंभीर काही ना काही विधान करतो आणि प्रत्येक वेळी वादात सापडतो. आशिया चषक २०२३ च्या सुपर ४ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना काल झाला आणि भारताने वन डे इतिहासातील पाकिस्तानवर सर्वात मोठा विजय मिळवला. विराट कोहली व लोकेश राहुल यांची शतकं आणि कुलदीप यादवने ५ विकेट्स गेत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. विराटला मॅन ऑफ दी मॅच पुरस्काराने गौरविण्यात आल, परंतु गौतम गंभीर कोहलीला हा पुरस्कार मिळाल्याने आनंदी दिसला नाही.


कोहलीने आपल्या शतकी खेळीने अनेक नवे विक्रम रचले. विराट आता वनडेमध्ये सर्वात जलद १३०००धावा करणारा फलंदाज बनला आहे. कोहलीने वन डे सामन्यांमध्ये एकूण ४७ शतकं झळकावली आहेत आणि सचिनच्या वनडे शतकांची बरोबरी करण्यापासून तो फक्त दोन शतकं दूर आहे. त्याचबरोबर त्याने राहुलसोबत आशिया चषकात २३३ धावांची सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम केला आहे. कोहलीने ९४ चेंडूत १२२, तर राहुलने १०६ चेंडूत १११ धावा केल्या.


गंभीरने सांगितले की, ''कुलदीप यादवशिवाय मला या पुरस्कारासाठी दुसरे कोणी दिसत नाही. कारण त्याने पाकिस्तानी फलंदाजांची अवस्था बिघडवली. मला माहीत आहे की, विराट आणि राहुल या दोघांनी शतके झळकावली आहेत. रोहित आणि गिलनेही अर्धशतके झळकावली आणि तीही अशा विकेटवर जिथे चेंडू स्विंग होत होता. पण जर कोणी ८ षटकांत ५ विकेट्स घेत असेल आणि तेही पाकिस्तानविरुद्ध, तर ती मोठी गोष्ट आहे. कारण पाकिस्तानी फलंदाज फिरकीला चांगले खेळतात.''


''मला माहित आहे की जर हा ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचा संघ असता तर गोष्ट वेगळी असती. कारण हे देश फिरकी नीट खेळत नाहीत. पण हा पाकिस्तान होता. कुलदीपने प्रत्येक फलंदाजाला बॅकफूटवर ढकलले. या लाइनअपसह वर्ल्ड कपमध्ये जाणे भारतासाठी खूप छान आहे कारण भारताकडे दोन आक्रमक वेगवान गोलंदाज आणि कुलदीप आहे,''असेही गंभीर म्हणाला. कुलदीपने ८ षटकांत २५ धावा देऊन ५ बळी घेतले.  

 

Web Title: Asia Cup 2023 IND vs PAK : Gautam Gambhir bemused by Virat Kohli winning Man of the Match against Pakistan; explains why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.