Join us

Asia Cup 2022, IND vs PAK : पाकिस्तानच्या प्रमुख खेळाडूची माघार; बाबर आजम रविवारी भारताच्या 'जावया'ला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवणार

भारताविरुद्धच्या लढतीपूर्वी पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त झाला आहे आणि त्याने रविवारी होणाऱ्या सामन्यातून माघार घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 18:37 IST

Open in App

Asia Cup 2022, India vs Pakistan : हाँगकाँगवर विजय मिळवून सुपर ४ मध्ये प्रवेश करणाऱ्या पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताविरुद्धच्या लढतीपूर्वी पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त झाला आहे आणि त्याने रविवारी होणाऱ्या सामन्यातून माघार घेतली आहे. भारताचा सामना करण्यापूर्वी हा पाकिस्तानला मोठा धक्का समजला जातोय... भारताचाही अष्टपैलू रविंद्र जडेजा याने दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याच्या जागी अक्षर पटेलची निवड केली गेली आहे. पण, पाकिस्तानने त्यांच्या दुखापतग्रस्त खेळाडूचा रिप्लेसमेंट अद्याप जाहीर केलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार बाबर आजम महामुकाबल्यात भारताच्या जावयाला संधी देण्याची शक्यता आहे.

आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने धक्कादायक निकाल नोंदवताना श्रीलंका व बांगलादेश यांच्यावर विजय मिळवून ब गटातून सुपर ४ मध्ये पहिले स्थान पटकावले. त्यापाठोपाठा पाकिस्तान व हाँगकाँगला नमवून भारतीय संघ अ गटातून सुपर ४ मध्ये दाखल झाला. करो वा मरो सामन्यात श्रीलंका व पाकिस्तान यांनी अनुक्रमे बांगलादेश व हाँगकाँगवर विजय मिळवून सुपर ४ मधील आपले स्थान पक्के केले. हार्दिक पांड्याच्या अष्टैपलू कामगिरी ( ३ विकेट्स व ३३* धावा) च्या जोरावर भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानला नमवले होते. त्या विजयात जडेजानेही महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान संघ तयारीत होता, पण...

पाकिस्तानचा गोलंदाज शाहनवाज दहानी ( Shahnawaz Dahani ) याला दुखापत झाली आहे आणि तो भारताविरुद्ध खेळणार नाही. त्याच्या जागी हसन अलीला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  शाहिन आफ्रिदी दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतल्याने हसन अलीची निवड झाली होती. हसन अलीचे भारतासोबत खास कनेक्शन आहे. हसन आणि त्याची पत्नी सामिया हे दोघे सर्वप्रथम एका रेस्टॉरंटमध्ये डिनर पार्टीदरम्यान भेटले होते. लवकरच दोघांची मैत्री झाली आणि नंतर दोघांनीही घरच्यांच्या संमतीने लग्न केले. दोघांचे लग्न दुबईत झाले होते. लक्षणीय बाब म्हणजे सामिया ही मूळची भारतातील आहे.

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानबाबर आजम
Open in App