India Vs Hongkong Live Match Highlight : सूर्यकुमार यादवची ( Suryakumar Yadav) फटकेबाजी आज पाहण्यासारखी होती. १३ षटकांत २ बाद ९४ धावा, अशी संघाची अवस्था असताना सूर्यकुमार मैदानावर आला अन् विराट कोहलीसह ( Virat Kohli) टोलेजंग फटकेबाजी केली. सूर्याने २२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याने २६ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ६८ धावा चोपल्या. २०व्या षटकात सूर्याने खेचलेले चार षटकार पाहून नॉन स्ट्राईकवर असलेला विराट अवाक् झाला अन् त्याने सूर्याला वाकून नमस्कार केला. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या याच सूर्यकुमार व RCBच्या विराट यांच्यात झालेली ठसन सर्वांनी पाहिली होती. आज त्याच सूर्याला विराटने मानाचा मुजरा केला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Asia Cup 2022 IND vs HK : काळाचं चक्र फिरलं! IPLमध्ये ठसन देणाऱ्या सूर्यकुमार यादवला विराट कोहलीचा मानाचा मुजरा
Asia Cup 2022 IND vs HK : काळाचं चक्र फिरलं! IPLमध्ये ठसन देणाऱ्या सूर्यकुमार यादवला विराट कोहलीचा मानाचा मुजरा
सूर्यकुमार यादवची ( Suryakumar Yadav) फटकेबाजी आज पाहण्यासारखी होती. १३ षटकांत २ बाद ९४ धावा, अशी संघाची अवस्था असताना सूर्यकुमार मैदानावर आला अन् विराट कोहलीसह ( Virat Kohli) टोलेजंग फटकेबाजी केली.
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 21:41 IST