India Vs Hongkong Live Match Highlight : पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ आज तुलनेने कमकुवत हाँगकाँगचा सामना करण्यासाठी मैदानावर उरतला आहे. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ आजचा सामना जिंकून Super 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे. हाँगकाँगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने आज प्रथम फलंदाजी करावी अशी चाहत्यांची इच्छा होती आणि ती आज पूर्ण झाली. सुपर ४ पूर्वी भारताला त्यांच्या फलंदाजांना पुरेपूर संधी देण्याची हीच संधी होती.
लोकेश राहुलची दुबईत ट्वेंटी-२०तील कामगिरी दमदार झाली आहे. त्याने १६ सामन्यांत १४७.६७च्या स्ट्राईक रेटने १ शतक व सहा अर्धशतकांसह ७३१ धावा केल्या आहेत. पाकिस्तानविरुद्ध तो गोल्डन डकवर बाद झाला होता, परंतु तो आजच्या सामन्यातून फॉर्मात येईल अशी अपेक्षा आहे. हाँगकाँगचा फिरकीपटू एहसान खन हा आशिया चषक क्वालिफायरमध्ये सर्वाधिक ९ विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. २०१८मध्ये हाँगकाँगने अखेरचा भारताचा सामना केला होता अन् त्यात एहसानने रोहित व महेंद्रसिंग धोनीची विकेट घेतली होती. आता त्याने विराट कोहलीची विकेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
हार्दिक पांड्याच्या जागी रिषभ पंतला संधी देण्यात आली आहे. हार्दिकने पाकिस्तनविरुद्ध ३ विकेट्स व नाबाद ३३ धावांची खेळी केली होती.
भारतीय संघ- रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युजवेंद्र चहल, अर्षदीप सिंग ( India Playing XI: Rohit Sharma (c), KL Rahul, Virat Kohli, Suryakumar Yadav, Dinesh Karthik (wk), Rishabh Pant, Ravindra Jadeja, Bhuvneshwar Kumar, Avesh Khan, Yuzvendra Chahal, Arshdeep Singh.)