अ‍ॅशेस 2019 : भोगा कर्माची फळं; आयसीसीकडून इंग्लंडचे चाहते ट्रोल

ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेत अ‍ॅशेस चषक आपल्याकडे राखण्यात यश मिळवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 09:49 AM2019-09-10T09:49:52+5:302019-09-10T09:50:17+5:30

whatsapp join usJoin us
Ashes 2019: ICC trolls England fans for mocking Steve Smith; fans say ICC got hacked | अ‍ॅशेस 2019 : भोगा कर्माची फळं; आयसीसीकडून इंग्लंडचे चाहते ट्रोल

अ‍ॅशेस 2019 : भोगा कर्माची फळं; आयसीसीकडून इंग्लंडचे चाहते ट्रोल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मँचेस्टर, अ‍ॅशेस 2019 : ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेत अ‍ॅशेस चषक आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. ऑस्ट्रेलियाने 18 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये अ‍ॅशेस चषक राखण्याचा पराक्रम केला. दुखापतीतून सावरणाऱ्या स्टीव्ह स्मिथनं चौथ्या कसोटीत दमदार खेळी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांना रडवलं. त्यानंतर पॅट कमिन्सनं दुसऱ्या डावात केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाचव्या दिवशी इंग्लंडचा 185 धावांनी धुव्वा उडवला. या दणदणीत विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. या विजयानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) इंग्लंडच्या चाहत्यांना ट्रोल केले. 
 

बेन स्टोक्सने असा काढला राग; व्हिडीओ झाला वायरल

मालिकेतील पाचवा व अखेरचा कसोटी सामना 12 स्पटेंबरपासून ओव्हल येथे खेळवण्यात येईल. मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी यजमानांना हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. या मालिकेत स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांना इंग्लंडच्या चाहत्यांनी टार्गेट केले. चेंडू कुरतडण्याप्रकरणात एका वर्षांची शिक्षा पूर्ण करून दोघांनी कसोटीत कमबॅक केला होता. त्यामुळे इंग्लंडच्या चाहत्यांनी त्यांना मुद्दाम डिवचले. वॉर्नरला साजेशी कामगिरी करता आली नसली तरी स्मिथनं आपल्या खेळीनं इंग्लंडच्या चाहत्यांची तोंड बंद केली.

'बेईमान' म्हणणाऱ्या चाहत्याची वॉर्नरने केली बोलती बंद, पाहा व्हिडीओ...

या संपूर्ण मालिकेत आतापर्यंत त्यानं तीन कसोटी सामन्यांत केवळ पाच डावांत सर्वाधिक 671 धावा केल्या आहेत. चौथ्या कसोटीत त्यानं 211 व 82 धावांनी खेळी साकारताना विजयात सिंहाचा वाटा उचलला. यावरूनच आयसीसीनं इंग्लंडच्या चाहत्यांना जैसे कर्म तैसे फळ याची आठवण करून दिली. 

त्यावर चाहत्यांची प्रतिक्रिया 





ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 383 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव 91.3 षटकांत 197 धावांत संपुष्टात आला. कमिन्सने 43 धावांत 4 प्रमुख फलंदाज बाद करत इंग्लंडचे कंबरडे मोडले. जोश हेजलवूड आणि नॅथन लियॉन यांनीही प्रत्येकी 2 बळी घेत चांगला मारा केला. इंग्लंडकडून सलामीवीर जो डेन्लीने 123 चेंडूत 6 चौकारांसह 53 धावा करत एकाकी झुंज दिली. कर्णधार जो रुट भोपळाही न फोडता बाद झाला, तर तिसऱ्या सामन्यात निर्णायक शतक झळकावून इंग्लंडला एकहाती विजय मिळवून देणारा बेन स्टोक्स केवळ एक धाव काढून परतला.

रविवारी 2 बाद 18 धावांवरुन सुरुवात करणाऱ्या इंग्लंडला अखेरच्या दिवशी केवळ 179 धावाच करता आल्या. आ
ऑसींच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडचे सर्वच प्रमुख फलंदाज ढेपाळले. पहिल्या डावात दिमाखदार द्विशतक ठोकणाºया स्टिव्ह स्मिथला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. 

Web Title: Ashes 2019: ICC trolls England fans for mocking Steve Smith; fans say ICC got hacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.