बेन स्टोक्सने असा काढला राग; व्हिडीओ झाला वायरल

आता तो व्हिडीओ चांगलाच वायरल होताना दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 04:20 PM2019-09-09T16:20:11+5:302019-09-09T16:21:08+5:30

whatsapp join usJoin us
Angry Ben Stokes hits his bat; The video has gone viral | बेन स्टोक्सने असा काढला राग; व्हिडीओ झाला वायरल

बेन स्टोक्सने असा काढला राग; व्हिडीओ झाला वायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मँचेस्टर, अ‍ॅशेस 2019 : चौथ्या अ‍ॅशेस सामन्यामध्ये  इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स निराश झाला. स्टोक्सने आपला राग बॅटवर काढल्याचे पाहायला मिळाले. या साऱ्या गोष्टीचा एक व्हिडीओ काढण्यात आला होता. आता तो व्हिडीओ चांगलाच वायरल होताना दिसत आहे.

चौथ्या सामन्यात इंग्लंडच्या चाहत्यांना स्टोक्सकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण यावेळी स्टोक्सला फक्त एकच धाव काढता आली. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने स्टोक्सला 31व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद केले. यावेळी पंचांनी बाद देण्यापूर्वीच स्टोक्स मैदानातून बाहेर पडला आणि बऱ्याच जणांना धक्का बसला. मैदानातून पेव्हेलियनमध्ये जात असताना स्टोक्सने आपला राग बॅटवर काढला. स्टोक्सने आपली बॅट पेव्हेलियनच्या जिन्यांवर काढल्याचे पाहायला मिळाले.


 पॅट कमिन्सने दुसऱ्या डावात केलेल्या भेदक माºयाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने चौथ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडचा पाचव्या दिवशी १८५ धावांनी धुव्वा उडवला. या दणदणीत विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. मालिकेतील पाचवा व अखेरचा कसोटी सामना १२ स्पटेंबरपासून ओव्हल येथे खेळविण्यात येईल. मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी यजमानांना हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव ९१.३ षटकात १९७ धावांत संपुष्टात आला. कमिन्सने ४३ धावांत ४ प्रमुख फलंदाज बाद करत इंग्लंडचे कंबरडे मोडले. जोश हेजलवूड आणि नॅथन लियॉन यांनीही प्रत्येकी २ बळी घेत चांगला मारा केला. इंग्लंडकडून सलामीवीर जो डेन्ली याने १२३ चेंडूत ६ चौकारांसह ५३ धावा करत एकाकी झुंज दिली. कर्णधार जो रुट भोपळाही न फोडता बाद झाला, तर तिसºया सामन्यात निर्णायक शतक झळकावून इंग्लंडला एकहाती विजयी मिळवून देणारा बेन स्टोक्स केवळ एक धाव काढून परतला.

रविवारी २ बाद १८ धावांवरुन सुरुवात करणाºया इंग्लंडला अखेरच्या दिवशी केवळ १७९ धावाच करता आल्या. आॅसीच्या भेदक माºयापुढे इंग्लंडचे सर्वच प्रमुख फलंदाज ढेपाळले. पहिल्या डावात दिमाखदार द्विशतक ठोकणाºया स्टिव्ह स्मिथला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. 

Web Title: Angry Ben Stokes hits his bat; The video has gone viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.