नवी दिल्ली : ‘पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या सन्मानार्थ रांची येथील ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान भारतीय संघाला ‘आर्मी कॅप’ घालण्याची परवानी दिली होती,’ असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी स्पष्ट केले.
८ मार्च रोजी रांची येथे झालेल्या या सामन्यातील सामना शुल्कही खेळाडूंनी राष्ट्रीय सुरक्षा निधीला प्रदान केली होती. पाकिस्तानने कॅप घालण्यावर आक्षेप नोंदविताच आयसीसीचे महाव्यवस्थापक क्लेरी फुलोंग यांनी याबाबत सांगितले की, ‘बीसीसीआयने निधी गोळा करण्यास व शहिदांच्या सन्मानार्थ कॅप घालण्याची परवानगी मागितली होती. दोन्ही गोष्टींची परवानगी आम्ही त्यांना दिली.’
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आयसीसीला बोचऱ्या शब्दात पत्र लिहून आर्मी कॅप घातल्याबद्दल भारताविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली होती. (वृत्तसंस्था)