Apollo Tyres Team India Sponsor: केंद्र सरकारने संसदेत ड्रीम ११ या ऑनलाईन जुगाराच्या अॅपवर बंदी आणल्यानंतर बीसीसीआयने टीम इंडियाच्या जर्सीवरून ड्रीम ११ चे नाव वगळले होते. यानंतर नव्या स्पॉन्सरच्या शोधात टीम इंडिया होती. आता तो शोध संपला आहे. अपोलो टायर्सने बीसीसीआयसोबत डील पक्की केली आहे. प्रत्येक सामन्यामागे अपोलो कंपनी 4.5 कोटी रुपये मोजणार आहे. ही रक्कम ड्रीम ११ पेक्षा ५० लाखांनी जास्त आहे.
अपोलो टायर्स आणि बीसीसीआयमध्ये ही डील झाली आहे. आता टीम इंडियाच्या जर्सीवर अपोलो टायरचे नाव दिसणार आहे. हा नवा करार २०२७ पर्यंत लागू राहणार आहे.
यामध्ये एकट्या बीसीसीआयचा फायदा नाही तर अपोलो टायर्सचाही फायदा होणार आहे. भारतात सर्वात मोठी टायर कंपनी ही एमआरएफ आहे. अपोलोला एमआरएफच्या तुलनेत आपली ब्रँड व्हॅल्यू वाढविण्याची संधी मिळणार आहे.
केंद्र सरकारने बेटिंग अॅपवर बंदी आणल्यानंतर बीसीसीआयने गेमिंग, बेटिंग, क्रिप्टो आणि तंबाखू उत्पादने बनविणाऱ्या कंपन्या बोली लावू शकणार नाहीत, असे स्पष्ट केले होते. याशिवाय खेळाडूंवर खासगी जाहिराती करण्यास बंधणे येत असल्याने खेळाच्या वस्तू बनविणाऱ्या कंपन्या, बँका आणि फायनान्शिअल कंपन्यांना देखील लांब ठेवण्यात आले होते. कोल्ड ड्रिंक, पंखे, मिक्सर, इन्शुरन्स सारख्या कंपन्यांनाही बोली लावण्यापासून मनाई करण्यात आली होती.