Join us

Virat Kohli Anushka Sharma: 'तुझ मे रब दिखता है...' म्हणणाऱ्या विराटसाठी पत्नी अनुष्काची स्पेशल पोस्ट

Asia Cup 2022 IND vs AFG: विराटने आपल्या बॅटने आणि शब्दांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले. त्यासोबतच अनुष्काने विराटला कठीण काळात साथ दिल्याचं तो शतक ठोकल्यानंतर म्हणाला. त्याला अनुष्काने अतिशय प्रेमाने खास पोस्ट करून गोड उत्तर दिले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 00:53 IST

Open in App

Virat Kohli Anushka Sharma: भारतीय क्रिकेटसाठी गुरूवारचा (८ सप्टेंबर) दिवस खूपच खास ठरला. तब्बल १,०२१ दिवसांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर टीम इंडियाचा रनमशिन विराट कोहली याने दमदार शतक ठोकले. विराटने या शतकाच्या जोरावर अनेक विक्रम मोडले. रोहितच्या अनुपस्थितीत कर्णधार लोकेश राहुलसोबत सलामीला आलेल्या विराटने पहिल्यापासूनच दमदार खेळी केली. अर्धशतकानंतर त्याने तुफान फटकेबाजी करत शतकी मजल मारली. विराटने १२ चौकार आणि ६ षटकार खेचत १२२ धावांची नाबाद खेळी केली. विराटच्या या खेळीच्या जोरावर भारताला अफगाणिस्तानवर विजय मिळवता आला. तसेच, विराटला या खेळीसाठी सामनावीराचा किताबही मिळाला. त्यानंतर झालेल्या मुलाखतीत आणि शतकानंतर इनिंग्ज ब्रेकमध्ये विराट त्याची पत्नी अनुष्काबद्दल भरभरून बोलला. आपल्या नवऱ्याने केलेल्या स्तुतीला पत्नीने खास पोस्ट करून उत्तर दिले.

विराट अनुष्काबद्दल काय म्हणाला?

"आजच्या शतकासाठी मी खूप खुश आहे. आजचा संपूर्ण दिवसच माझ्यासाठी आनंददायी आहे. मधल्या काळात मी अनेक मालिकांमधून विश्रांती घेतली. त्यावेळी मला क्रिकेटपासून लांब राहता आलं आणि माझ्याबद्दल नक्की काय सुरू आहे, याचा अंदाज घेता आला. अशा कठीण परिस्थितीत मी त्या खास व्यक्तीचं नाव घेतलंच पाहिजे - अनुष्का - माझ्या वाईट काळामध्ये ती माझ्या बाजूने ठामपणे उभी राहिली आमि तिने मला आधार दिला. मला तिचं कौतुक केलंच पाहिजे, कारण जेव्हा मी उद्ध्वस्त झाल्यासारखा वागत होतो त्यावेळी तिने मला पाठिंबा दिला आणि सांभाळलं. तिने माझा सगळा राग सहन केला, मला योग्य प्रकारचं मार्गदर्शन करत राहिली, मला आयुष्यात पुढे जात राहण्यासाठी प्रेरणा दिली आणि त्यामुळेच मी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पूर्वीच्याच जोशाने उभा राहू शकलो. देवाने मला तिच्यासोबत आयुष्य दिलंय याचं मला खरंच खूप बरं वाटतं", असं विराट कोहली अनुष्काची स्तुती करताना म्हणाला.

तसेच, आज ठोकलेले शतक विराटने अनुष्का आणि मुलगी वामिका यांना समर्पित केले. "गेल्या तीन वर्षांपासून मी शतकाच्या प्रतिक्षेत आहे. आज मी ठोकलेलं शतक सेलिब्रेशन करण्याजोगं आहे की नाही, याबद्दल मी आताच काही बोलणार नाही. पण आजचं शतक हे माझ्यासाठी खूपच खास आहे. गेल्या अडीच-तीन वर्षांनी मला खूप काही शिकवलं. नशीबाची साथ आणि भूमिका किती महत्वाची असते, याची मला पूरेपुर प्रचिती आली. त्यामुळेच आजचं हे शतक मी माझी पत्नी अनुष्का आणि माझी मुलगी वामिका हिला समर्पित करतो. अनुष्का माझ्या कठीण काळात माझ्या पाठिशी उभी राहिली होती. मी आज जो काही कणखरपणे उभा आहे त्याला अनुष्काचेच पाठबळ आहे. अनुष्कामुळे मी सकारात्मकतेने खेळत राहिलो आणि आज त्याचं मला फळ मिळालं", असे विराट म्हणाला.

अनुष्काची विराटसाठी स्पेशल पोस्ट

अनुष्काने देखील त्याने केलेल्या स्तुतीनंतर, इन्स्टाग्रामवर खास पोस्ट करत त्याला संदेश दिला. "कोणतीही आणि काहीही परिस्थिती आली, तरीही मी सदैव तुझ्याबरोबर असेन", असा अतिशय गोड संदेश तिने विराटला दिला. त्यासोबत, त्याचा शतक ठोकलेला फोटोही पोस्ट केला.

दरम्यान, विराट कोहली खराब फॉर्मशी झुंजत होता, त्यावेळी अनेकांनी अनुष्का शर्माला दोष दिला होता. त्या सर्वांने आज विराटने आपल्या बॅटने आणि शब्दांनी सडेतोड उत्तर दिले. 

टॅग्स :एशिया कप 2022विराट कोहलीअनुष्का शर्माभारतीय क्रिकेट संघ
Open in App