Join us

आणखी एक मोठा पेच! पाकिस्तानात कोणते ४ सामने होणार? यजमानपद नावालाच, पहा अंदाज...

भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ यांच्यात एकूण १३ वन डे सामने होणार आहेत. या संघांची दोन गटांत विभागणी केली जाणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 09:10 IST

Open in App

आशिया कपच्या अंदाजे शेड्यूलची घोषणा झाली आहे. पाकिस्तानात चार तर ९ सामने श्रीलंकेत खेळविले जाणार आहेत. ३१ ऑगस्टला ही स्पर्धा सुरु होणार आहे, ती १७ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. हायब्रिड मॉडेलला पाकिस्तानी बोर्डाची परवानगी मिळालेली असली तरी पाकिस्तानात कोणते सामने होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. 

भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ यांच्यात एकूण १३ वन डे सामने होणार आहेत. या संघांची दोन गटांत विभागणी केली जाणार आहे आणि प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर ४ मध्ये खेळतील आणि त्यातून फायनलचे दोन संघ ठरतील.  

पाकिस्तानला काय तो यजमानपदाचाच आनंद घेता येणार आहे. कारण पाकिस्तानात जे सामने होणार त्याचा अंदाज घेतला असता त्यातील एकाच सामन्यात पाकिस्तानला स्वत:च्या देशात खेळता येणार आहे. कारण भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असणार आहेत. बीसीसीआयने भारतीय संघाला पाकिस्तानात पाठविणार नसल्याचे म्हटले असल्याने या दोघांत एकही सामना होणार नाही.

आशिया कपचे फुल शेड्यूल आल्यावरच सारे स्पष्ट होणार असले तरी अंदाजे कोणते पाकमध्ये सामने होतील... स्पर्धेच्या सुरुवातीचे सामने फक्त पाकिस्तानमध्ये होणार आहेत. असे झाले तर पाकिस्तानची एकच मॅच पाकिस्तानात होणार आहे. 

हे सामने होतील...- पाकिस्तान विरुद्ध नेपाळ- बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान- अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका- श्रीलंका विरुद्ध बांगलादेश

आशिया कपमधील ग्रुप स्टेजशिवाय सुपर ४ मधील कोणतेही सामने पाकिस्तानात होणे कठीण आहे. कारण पहिल्या फेरीतील सामने फिक्स असतात. परंतू, सुपर फोरमध्ये कोण जाईल, कसा जाईल हे आताच सांगणे कठीण असते. यामुळे पाकिस्तानात हे सामने खेळविले जाणार नाहीएत. आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. भारतीय संघाने सर्वाधिक 7 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. तर श्रीलंकेने सहा वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. पाकिस्तानला केवळ दोनदाच ही स्पर्धा जिंकता आली आहे.  

टॅग्स :एशिया कप 2022पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघश्रीलंका
Open in App