Join us  

डेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का

चेंडूशी छेडछाड केल्याची वॉर्नरने कबुली दिली. या गोष्टीचा विपरीत परीणाम त्याची पत्नी कँडिसवर झाला. कारण या प्रकरणाची कबुली दिल्यानंतर कँडिसचा गर्भपात झाला. एका मुलाखतीमध्ये तिने ही गोष्ट सांगितली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 8:37 PM

Open in App
ठळक मुद्दे या साऱ्या प्रकरणामुळे माझ्यावरचे दडपण वाढले. या अतिरीक्त दडपणामुळेच आम्हाला बाळ गमवावे लागले, असे कँडिसने मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

सिडनी : दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात चेंडूशी छेडछाड केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला मोठा फटका बसला होता. पण त्यानंतरही त्याला एक मोठा धक्का बसला आहे. पण हा धक्का क्रिकेटशी निगडीत नाही तर वैयक्तिक आयुष्याशी संबंधित आहे. 

 चेंडूशी छेडछाड केल्यामुळे वॉर्नरवर आयसीसीने एका वर्षाची बंदी घातली आहे. त्यामुळे त्याला आयपीएलमध्येही यावेळी खेळता आले नाही. त्यामुळे वॉर्नरचे वय पाहता त्याच्या कारकिर्दीसाठी हा मोठ समजला जात आहे. कारण एका वर्षानंतर वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी फिट असेल की नाही, हा मोठा प्रश्न असेल. त्याचबरोबर स्थानिक क्रिकेट खेळून त्याला आपला फॉर्म कायम ठेवता येऊ शकतो का, हेदेखील पाहावे लागेल.

चेंडूशी छेडछाड केल्याची वॉर्नरने कबुली दिली. या गोष्टीचा विपरीत परीणाम त्याची पत्नी कँडिसवर झाला. कारण या प्रकरणाची कबुली दिल्यानंतर कँडिसचा गर्भपात झाला. एका मुलाखतीमध्ये तिने ही गोष्ट सांगितली आहे. या साऱ्या प्रकरणामुळे माझ्यावरचे दडपण वाढले. या अतिरीक्त दडपणामुळेच आम्हाला बाळ गमवावे लागले, असे कँडिसने मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

डेव्हिड आणि कँडिस या वॉर्नर दाम्पत्याला आयव्ही माय (३) आणि इंडी राय (२) अशा दोन मुली आहेत. यानंतर आपल्या कुटुंबामध्ये अजून एक पाहुणा यावा, अशी या दोघांचीही इच्छा होती. डेव्हिड केपटाऊनमध्ये असतानाच कँडिस गरोदर आहे, हे या दोघांनाही समजले होते. त्यानंतरच काही दिवस त्यांनी बरीच स्वप्न रंगवली होती. चेंडूशी छेडछाड केल्याची कबुली दिल्यानंतर एके दिवशी रक्तस्त्राव होत असल्याचे कँडिसला समजले. त्यावेळी आपल बाळ या जगात येऊ शकत नाही, हे कँडिसला समजले होते. तिने डेव्हिडलाही ही गोष्ट सांगितली. त्यानंतर हे दोघेही काही दिवस निराशेच्या गर्तेत अडकले होते. अखेर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची समजूत घातली आणि त्यांना या निराशेच्या गर्तेतून बाहेर काढले.

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरचेंडूशी छेडछाडआॅस्ट्रेलियाक्रिकेटआयसीसी