Join us

अनिल कुंबळेची प्रशिक्षकपदी निवड, आता 'या' खेळाडूंना मार्गदर्शन करणार

रवी शास्त्री यांच्या पूर्वी कुंबळेने भारताचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. संघातील वादामुळे कुंबळेने प्रशिक्षकपद सोडले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 13:16 IST

Open in App

मुंबई : भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेची प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. काही दिवासांमध्ये ते आपले पद सांभाळणार असून संघातील खेळाडूंना ते आता मार्गदर्शन करणार आहे.

रवी शास्त्री यांच्या पूर्वी कुंबळेने भारताचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. संघातील वादामुळे कुंबळेने प्रशिक्षकपद सोडले होते. पण आता कुंबळेला प्रशिक्षकपद देण्यात आले आहे.

आयपीएलमधील किंग्स इलेव्हन पंजाब या संघाने कुंबळेला मुख्य प्रशिक्षकपद लिलावापूर्वीच दिले आहे. आयपीएलच्या आगामी पर्वाचा लिलाव डिसेंबरमध्ये होणार आहे. या लिलावाच्यावेळी कुंबळे पंजाबच्या संघाच्या निवडीमध्ये पाहायला मिळेल.

आयपीएलमध्ये 2013 साली मुंबई इंडियन्सचे मार्गदर्शकपद कुंबळेने भुषवले होते. त्यावर्षी मुंबईच्या संघाने जेतेपद पटकावले होते. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्य संघाचे प्रशिक्षकपदही कुंबळेने भुषवले होते.

टॅग्स :अनिल कुंबळेकिंग्ज इलेव्हन पंजाबमुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरआयपीएल