Join us  

... आणि राहुल द्रविडचा साधेपणा पुन्हा एकदा दिसून आला, फोटो सोशल मीडियात व्हायरल 

फक्त क्रिकेटमध्येच नाही तर व्यकीगत आयुष्यात किंवा समाजात वावरताना सुद्धा एका साध्या- सरळ गृहस्थाप्रमाणे राहतो. याचे साधे उदाहरण द्यायचे म्हटले, तर सध्या राहुल द्रविडचा रांगेत उभा असलेला एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 8:50 PM

Open in App
ठळक मुद्देराहुल द्रविडचा रांगेत उभा असलेला एक फोटो सोशल मीडियात व्हायरल विद्यार्थ्यांच्या पालकांसारखेचं अत्यंत साधेपणाने तो रांगेमध्ये उभा होताकोणताही शो ऑफ नाही, पेज 3 अॅटिट्यूट नाही

बंगळुरु : भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजीचा भिंत आणि क्रिकेट कारकिर्दीत नेहमीच संयमी खेळाडू म्हणून राहुल द्रविड ओळखला गेला. मात्र, फक्त क्रिकेटमध्येच नाही तर व्यकीगत आयुष्यात किंवा समाजात वावरताना सुद्धा एका साध्या- सरळ गृहस्थाप्रमाणे राहतो. याचे साधे उदाहरण द्यायचे म्हटले, तर सध्या राहुल द्रविडचा रांगेत उभा असलेला एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.एका शाळेच्या आवारात विज्ञान प्रदर्शनाच्या रांगेत उभा असलेला हा राहुल द्रविडचा फोटो आहे. विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी राहुल द्रविड त्याच्या मुलांसोबत आला होता. विशेष म्हणजे, एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे तो रांगेत न उभारता सरळ आत जाऊ शकला असता. पण, त्याने तसे केले नाही. इतर विद्यार्थ्यांच्या पालकांसारखेचं अत्यंत साधेपणाने तो रांगेमध्ये उभा होता. दरम्यान, यासंबंधीचा एक फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे, यामध्ये असे लिहिले आहे की, कोणताही शो ऑफ नाही, पेज 3 अॅटिट्यूट नाही, सेलिब्रिटी असल्याचा आविर्भावही नाही. इतर पालकांसारखाच तोही रांगेमध्ये उभा आहे. हे कौतुकास्पद आहे. 

दरम्यान, राहुल द्रविडने 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत तंत्रशुद्ध, संयमी आणि शांत खेळीने आपली वेगळी ओळख निर्माण केली. 11 जानेवारी 1973 साली मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये जन्म झालेल्या राहुल द्रविडने 1996 साली इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात कसोटी विश्वात पदार्पण केले होते.

 

टॅग्स :राहूल द्रविडसोशल मीडिया